Farooq Jamadar As Kurundwad Deputy Mayor Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कुरुंदवाड उपनगराध्यक्षपदी फारूक जमादार

अनिल केरीपाळे

कुरुंदवाड : येथील पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे फारूक जमादार यांची बिनविरोध निवड झाली. निवडीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. 
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलावली होती.

पालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाची आघाडी आहे. मात्र काही महिन्यांपासून कुरबुरी वाढल्या होत्या. श्री. जमादार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक आग्रही होते. त्यामुळे कॉंग्रेसपुढे पेच निर्माण झाला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी जमादार यांच्या नावाला संमती दिली. त्यानंतर नगराध्यक्ष जयराम पाटील व युवा नेते विजय पाटील यांनी श्री. जमादार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत आघाडीतील बिघाडी थांबवली.

उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे श्री. जमादार यांचा एकमेव अर्ज दाखल होता. नगराध्यक्ष पाटील, मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगरसेवकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली होती. नगरसेवक जमादार यांचा एकमेव अर्ज आल्याने नगराध्यक्ष पाटील यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. 

नूतन उपनगराध्यक्ष फारूक जमादार म्हणाले, ""मला कार्यकाळ किती मिळाला यापेक्षा मला मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करेन आणि आघाडीच्या नेत्यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असेल.'' नगराध्यक्ष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विजय पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी आलासे, दादासाहेब पाटील, रमेश भुजुगडे, दीपक पोमाजे, बाळासाहेब गायकवाड, दिलीप बंडगर आदींनी मनोगत व्यक्त केले. 

निवडीच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीला नगरसेवक अक्षय आलासे, विरोधी पक्षनेत्या सौ. सुजाता मालवेकर, नगरसेवक रामचंद्र डांगे, दीपक गायकवाड, उदय डांगे, जवाहर पाटील, प्रा. सुनील चव्हाण, अनुप मधाळे, किरणसिंह जोंग, फारूख जमादार आदी तर सभागृहात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT