Fasting of anti-electricity bill action committee in Kodoli 
कोल्हापूर

कोडोलीत वीज बिलविरोधी कृती समितीचे उपोषण

विश्वास साळोखे

कोडोली : येथील वीज बिलविरोधी कृती समिनीने महावितरण कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. आमदार डॉ. विनय कोरे यांनी भेट दिली असता त्यांना वीज बिल माफ करण्याचे निवेदन दिले. तसेच उपअभियंता माने यांनी निवेदन स्वीकारत वीज बिल हप्त्याने स्वीकारणार व कोणावरही अन्याय होणार नसल्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले.

कोरोना काळामध्ये भरमसाट बिले आली आहेत. आघाडी सरकारने कोरोना काळातील बिले माफ करण्याचे जनतेला वचन दिले होते; परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच ऊर्जामंत्र्यांनी बिल वसुलीचे आदेश दिले. याच्याविरोधात कोडोली वीज बिलविरोधी कृती समितीतर्फे जिल्हा परिषद सदस्य विशांत महापूरे, अशोक गायकवाड, दीपक सकटे, विकास चोपडे, नरेंद्र पाटील, अरुण महापूरे, अनिल महापूरे, दीपक चौगुले यांनी लाक्षणिक उपोषण केले होते.

जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच निखील पाटील, मानसिंग पाटील, शेतकरी संघटनेचे युवा नेते सौरभ शेट्टी, पन्हाळा सभापती रणजित शिंदे, कोडोली शिक्षण संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, किरण पाटील, जनसुराज्याचे प्रवक्ते व सरचिटणीस ऍड. राजेंद्र पाटील यांच्यासह शेतकरी संघटना, व्यापारी संघटना, कोडोली परिसर दळप-कांडप संघटना, शेतकरी कामगार पक्ष, दलित महासंघ अशा विविध संघटनांनी उपोषणास पाठिंबा दर्शविला. यावेळी कोडोली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT