father death after son died in belgaum sankeshwar 
कोल्हापूर

दुर्दैव- मुलाच्या निधनाची बातमी समजताच वडिलांचेही निधन

आनंद शिंदे

संकेश्वर - येथील प्रसिध्द चिरमुरे व्यापारी राजेंद्र पुंडलिक काळेकर (वय ५७) यांचे बुधवारी (ता. ९) हृदयविकाराने निधन झाले. त्याची माहिती मुंबई येथे आपल्या लहान मुलाकडे असलेल्या वडील पुंडलिक गंगाराम काळेकर (वय ८५) यांना समजली. त्याचा धक्का बसून त्यांचेही निधन झाले. 

अथणी शासकीय रुग्णालयातील डाॅ. मोहन काळेकर यांचे पुंडलिक काळेकर हे वडील होत. तीन तासाच्या अंतराने मुलगा आणि वडिलांचे निधन झाले. गुरुवारी (ता. १०) सकाळी ११ वाजता मुंबईहुन वडील पुंडलिक यांचा मृतदेह आणल्यानंतर मुलाची व त्यांची एकत्रितच अत्यंयात्रा काढली. हिरण्यकेशी नदीकाठी स्मशानभुमीत दोघांवर अंत्यविधी केले. 

काळेकर यांचे चिरमुरे अमेरिकेत

 संकेरश्वर परिसरातील पहिली चिरमुरे भट्टी पुंडलिक काळेकर यांनीच सुरु केली. जवारी चिरमुरयाची चव त्यांनी विविध ठिकाणी पोहचविली. चिरमुरे व्यावसायात आज त्यांची पाचवी पिढी कार्यरत आहे. तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल हे याच दुकानातून चिरमुरे घेऊन आपल्या अमेरिकेतील नातेवाईकांना पाठवत असत. अतिशय प्रामाणिक, मनमिळाऊ स्वभावामुळे आजही त्यांचे नाव सर्वत्र आहे. राजेंद्र काळेकर हे येथील हिरण्यकेशी शिक्षण मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT