Fear of thieves in Gandhinagar market 
कोल्हापूर

गांधीनगर बाजारपेठेत चोरट्यांची धास्ती

प्रवीण जाधव

गांधीनगर ः या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, आज पहाटे चोरट्यांनी गांधीनगर-चिंचवाड मुख्य रस्त्यावरील सहा दुकानांना लक्ष्य करून सुमारे साठ हजारांसह चांदीचे दागिने लंपास केले. वळिवडे गावच्या हद्दीतील दोन किराणा दुकान, मोबाईल दुकान, दोन हार्डवेअर दुकाने आणि एका ऑईलच्या दुकानात चोरी झाली. 
आज पहाटे तीन ते चार च्या दरम्यान चोरट्यांनी अशोक शेंडगे यांच्या साई समर्थ दुकानाचे शटर उचकटून ड्रॉव्हरमधील रोख 40 हजार रुपये घेऊन शेजारी असणाऱ्या इंद्रा मोबाईल दुकानाचे शटर उचकटून ड्रॉव्हरमधून दहा हजार रुपये व चांदीचे दागिने लंपास केले. तेथून काही अंतरावर असणाऱ्या संजय चव्हाण यांच्या हरिप्रिया सेल्स या बिल्डिंग मटेरियलच्या दुकानाचा दरवाजा उचकटून 7 हजार रुपये लंपास केले. उमेश बजाजी यांच्या जीएसके हार्डवेअरमधून तीन हजार रुपये, तर अशोक चव्हाण यांच्या दत्त किराणा स्टोअर्समधून गुटखा लंपास केला. महालक्ष्मी लुब्रिकेंटसमध्ये चोरट्यांच्या हाताला काहीही लागले नाही. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. 

व्यापाऱ्यांत धास्ती 
काही दिवसांपूर्वी सरनोबतवाडीत चोरट्यांनी चार ते पाच बंगल्यांना लक्ष्य करीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. तो तपास चालू असतानाच पुन्हा चोरीची घटना घडल्याने गांधीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT