female doctor was beaten after entering the hospital 
कोल्हापूर

निमित्त पार्किंगचे ; रुग्णालयात घुसून महिला डॉक्‍टरला पितळी घोडा फेकून केली मारहाण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पार्किंगमध्ये लावलेली गाडी काढण्याच्या कारणावरून जमावाने रुग्णालयात घुसून साहित्याची नासधूस करीत महिला डॉक्‍टरसह दोघांना मारहाण केली. शनिवार पेठ पोस्ट कार्यालयाजवळ आज दुपारी हा प्रकार घडला. याबाबतची फिर्याद डॉ. जयंता अभय पाटील यांनी दिली. या प्रकरणी संशयित उदयानी साळुंखे यांच्यासह १० ते १२ जणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.


शनिवार पेठेत डॉ. जयंता पाटील यांचे माऊली हॉस्पिटल आहे. आज दुपारी त्यांच्या पार्किंगसमोर मोटार उभी केली होती. ती हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी काढण्यास सांगताच संशयित उदयानी साळुंखे (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यासह १० ते १२ जण हॉस्पिटलमध्ये घुसले. त्यातील काहींनी डॉ. पाटील यांना कन्सल्टिंग रूममधील पितळी घोडा फेकून मारला. त्यांचा मुलगा विश्‍वजित भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही मारहाण केली.

काहींनी संगणकासह साहित्याची नासधूस करून कुंड्या, खुर्च्या विस्कटल्याची फिर्याद पाटील यांनी दिली. त्यानुसार साळुंखेसह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली

Ganpati Visarjan 2025 Live Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर बनणार टीम इंडियाचा 'कर्णधार'; हालचालींना वेग, लवकरच होणार संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT