The festival will be held today ... 
कोल्हापूर

रंगोत्सव आज रंगणार .... 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : होलिकोत्सवातील आबालवृद्धांचा आनंदोत्सव असणारी रंगपंचमी उद्या (शुक्रवारी) सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे. यंदाही इकोफ्रेंडली आणि पाण्याचा अपव्यय टाळून कोरड्या रंगपंचमीवर भर दिला जाणार आहे.

रंगपंचमीलाही सामाजिकतेचीही झालर लाभणार असून विविध सेवाभावी संस्थांत जाऊन तरुणाई रंगोत्सव साजरी करणार आहे. दरम्यान, शाळांशाळांत आज रंगपंचमी साजरी झाली.  रंगपंचमीसाठी बाजारपेठेत यंदा नैसर्गिक रंगांसह कमीत कमी पाण्याने धुता येतील, असे विविध पर्यावरणपूरक रंग उपलब्ध आहेत. त्यांच्या खरेदीसाठीच आजपासून बाजारपेठेत गर्दी राहिली. बालमित्रांच्या आनंदाला उधाण आणणाऱ्या विविधरंगी पिचकाऱ्यांनाही मोठी मागणी आहे. काही ठिकाणी पर्यावरणपूरक रंगांच्या नावाखाली रासायनिक रंगांची विक्री होत आहे. त्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, रंगपंचमीनिमित्त शहराबाहेर जाऊन रस्सा मंडळाचे बेतही आखले जात आहेत. मात्र, तेथेही कुठले गैरप्रकार होऊ नयेत, याची खबरदारी घेतली जात आहे. 
..... 
"कोरोना'मुळे चिनी 
रंग,पिचकाऱ्यांना फटका 
"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर यंदा बाजारपेठेत चीनी रंग आणि पिचकाऱ्यांना फटका बसला आहे. स्थानिक रंग आणि पिचकाऱ्यांनी बाजारपेठ सजली असून सायंकाळनंतर खरेदीसाठी झुंबड उडाली. 

महिलांसाठी विविध ठिकाणी सामूहिक रंगपंचमी 
शहरातील विविध उपनगरांत खास महिलांसाठी सामूहिक रंगपंचमीचे आयोजन केले आहे. महिलांना सुरक्षितपणे रंगपंचमीचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने हे कार्यक्रम होणार आहेत. संभाजीनगर, जरगनगर, सानेगुरूजी वसाहत परिसरात हा आनंदोत्सव साजरा होईल. 

वंचितांबरोबर रंगोत्सव 
येथील सार्थक क्रिएशन्सच्या वतीने शाहू टोलनाका परिसरातील एकटी संस्थेतील पन्नासहून अधिक निराधार महिला व पुरूषांसोबत रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. दुपारी बारा वाजता रंगोत्सव आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम येथे होईल. 

का नकोत रासायनिक रंग? 
- रासायनिक रंगामुळे त्वचेची आग होणे, डोळ्यांची जळजळ होणे व डोळ्यांत रंग गेल्याने तात्पुरता आंधळेपणाही येतो. 
- काही ठिकाणी रंगात पेट्रोल, डिझेल, तैलरंग व रासायनिक द्रव्ये वापरण्याचे प्रमाण आहे. रासायनिक पदार्थांमुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्‌भवतात. त्वचाविकार व डोळ्यांना इजा झाल्याचे प्रकार समोर येत असून, काहींना डोळेही गमवावे लागले आहेत. 
- अचानक कुठून तरी फेकल्या गेलेल्या पाण्याच्या फुग्यामुळे डोळ्यांच्या दुखापतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 
- रंग अधिक काळ टिकून राहावा, यासाठी रंगात बूटपॉलिश, ऑइलपेंट व हेअरडायही मिसळला जातो. त्यामुळे त्वचेचा कर्करोग, केस गळणे, चेहरा व हाता-पायांवर पांढरे डाग पडणे, त्वचारोग अशा समस्या उद्‌भवतात. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT