Fielding for candidature to all parties of illegal business 
कोल्हापूर

अवैध व्यावसायिकची सर्व पक्षांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग

निवास चौगले

कोल्हापूर ः महापालिकेच्या निवडणुकीसाठी चांगले चारित्र्यापेक्षा सर्वच पक्षांकडे उमेदवारीसाठी अवैध व्यवसायाशी संबंधित इच्छुकांची भाऊगर्दी असल्याचे चित्र आहे. उमेदवारीसाठी राजकीय पक्षांच्या जोडण्यांमुळे अपवाद वगळता महापालिकेच्या 81 प्रभागांवरील आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर सत्तारूढ कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना, ताराराणी आघाडीकडून शहरात उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. 
यानिमित्ताने पक्षाच्या नेत्यांना भेटणाऱ्या चेहऱ्यात तेचतेच चेहरे आणि त्यातही काहीजण अवैध व्यवसायाशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूरच्या जनतेनेच अशा प्रवृत्ती रोखण्याची गरज या निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झाली आहे. 
अवैध व्यावसायिकांबरोबरच कडक इस्त्रीची पांढरी कपडे घालून महापालिकेच्या राजकारणात वर्षानुवर्षे वावरणाऱ्या, पण भ्रष्टाचारी प्रवृती असलेल्यांचा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अलीकडेच संपलेल्या सभागृहातील माजी उपमहापौर सध्या मटक्‍याच्या कारवाईप्रकरणी कारागृहाची हवा खात आहेत. हा इतिहास ताजा असतानाच पुन्हा याच प्रवृत्तीचे काहीजण उमेदवारीसाठी नेत्यांचे उंबरे झिजवताना दिसत आहेत. काही सावकारांनी या निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत, आपल्याला नाही तर घरातील कुणालाही उमदेवारी दिली तर पक्षाने पैसेही देऊ नयेत, अशी भूमिका घेत हे सावकार उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. मावळत्या सभागृहातही एका पदाधिकाऱ्याची सावकारी आणि त्याचा दारात सावकारीपोटी ओढून आणलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा खच, याच सभागृहातील एका महिला सदस्यांच्या पतीच्या सावकारीला कंटाळून बांधकाम व्यावसायिकाने केलेली आत्महत्या, या गोष्टीचा विसर पडल्याचे चित्र नेत्यांकडे भेटायला येणाऱ्यांकडे नजर टाकल्यावर पाहायला मिळते. 


अर्थिकबाजू सक्षम असल्यानेच दावा 
गेल्या दोन-तीन निवडणुकींचा इतिहास पाहता काहीजण सोडले तर ज्यांची अर्थिक बाजू सक्षम आहे आणि लाखो रुपये खर्च केलेत, तेच विजयी झाले आहेत. त्यातही यात पक्षांकडून लढलेल्यांचा समावेश जास्त आहे. निवडणुकीसाठी कष्टाने मिळवलेले पैसे खर्च करण्याची ऐपत थोड्या लोकांकडे आहे, याचीही जाणीव नेत्यांना आहे. त्यातूनच अशा अवैध मार्गाने पैसे मिळवलेल्या उमेदवारांना पक्षांकडूनही पायघड्या घातल्या जातात.

-- संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

SCROLL FOR NEXT