Fifteen lakhs for a loan of five lakhs
Fifteen lakhs for a loan of five lakhs 
कोल्हापूर

पाच लाख कर्जासाठी पंधरा लाख दिले तरीही कर्ज थकीत का ते वाचा

धनाजी आरडे

गारगोटी, कोल्हापूर  : पाच लाख रुपये रकमेपोटी सुमारे पंधरा लाख रुपये व्याजासह देऊनही पुन्हा व्याजाच्या पैशाचा तगादा लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर बेकायदेशीर खासगी सावकारीचा भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. रोहन अशोक कोळी (रा. गारगोटी), प्रथमेश बळवंत भादवणकर (रा. आकुर्डे) अशी त्यांची नावे आहेत. 
पोलिसांनी सांगितले की, म्हसवे येथील विनायक दत्तात्रय देसाई व करडवाडी येथील रामदास शिवाजी देसाई यांचा ट्रक व्यवसाय आहे. ऊस वाहतुकीचा व्यवसाय अडचणीत आल्यामुळे साखर कारखान्याची उचल फिटली नाही. यामुळे दुसऱ्या वर्षीचा ऍडव्हान्स मिळणार नसल्यामुळे पहिली ऍडव्हान्स रक्कम भरण्यासाठी रोहन कोळी याच्याकडून जुलै 2018 मध्ये पाच लाख रुपयांची रक्कम घेतली होती. या रकमेपैकी 3 लाख 21 हजार रुपये कारखान्यास भरले व उर्वरित 1 लाख 79 हजारांची रक्कम धनादेशाद्वारे रोहन यास परत केली. त्यानंतर रोहन याने 3 लाख 21 हजार रुपये महिना दहा टक्के व्याजाने हप्त्याने देण्यास सांगितले होते. 
या रकमेच्या पोटी वेळीवेळी सुमारे 7 लाख 50 हजार रुपये दिले. याशिवाय ट्रक तारण ठेवून 7 लाख असे सुमारे 14 लाख 67 हजार रुपये रोहन कोळी व प्रथमेश भादवणकर यांनी घेतले. तसेच गुंडाकरवी धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. रोहन व प्रथमेशमुळे ट्रक व्यवसायही बुडाला, ट्रकही गहाण गेले. यामुळे जीवन जगणे असह्य झाल्याची फिर्याद विनायक देसाई व रामदास देसाई यांनी पोलिसांत दाखल केली आहे. याप्रकरणी रोहन कोळी व प्रथमेश भादवणकर यांच्यावर पोलिसांत बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT