Fifteen two-wheelers seized by Belgaum Municipal Corporation are missing 
कोल्हापूर

बेळगाव महापालिकेने जप्त केलेल्या 'त्या' पंधरा दुचाकी गायब...?

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - महापालिकेने जप्त केलेल्या बाऊन्स कंपनीच्या 32 दुचाकींपैकी 17 दुचाकीच कार्यालयाच्या आवारात आहेत. त्यामुळे उर्वरीत 15 दुचाकी गेल्या कोठे? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे लॉक डाऊन मुळे बाऊन्स कंपनीने बेळगाव शहरातील आपली सेवा बंद केल्याचे महापालिकेच्या महसूल विभागाचे म्हणने आहे. बाऊन्स कंपनीने दंड व अधिभाराची रक्कम भरल्याशिवाय त्यांना दुचाकी परत दिल्या जाणार नाहीत असेही महसूल विभागाकडून सांगीतले जात आहे. पण कंपनीने दंड व अधिभार रक्कम भरली तर मग त्यांना 32 दुचाकी द्याव्या लागतील. त्यावेळी गायब झालेल्या 15 दुचाकी महापालिका कोठून देणार? असाही प्रश्‍न आहे.

दुचाकी भाडेतत्वावर देणाऱ्या बाऊन्स कंपनीने 2019 सालच्या अखेरीस बेळगावात आपली सेवा सुरू केली होती. त्याची जोरदार जाहीरातही त्यानी केली होती. पण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यानी महापालिकेकडून रीतसर परवानगी घेतली नव्हती. शिवाय महापालिकेला पायाभूत सुविधा अधिभार व भूभाडे दिले नव्हते. त्यामुळे 25 व 26 फेब्रुवारी रोजी महापालिकेने या कंपनीवर कारवाई केली. दोन दिवसात तब्बल 32 दुचाकी ताब्यात घेतल्या. महापालिकेच्या महसूल व अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यानंतर कंपनीच्या बेळगावातील प्रतिनिधीनी महापालिका कार्यालयात जावून परवानगीसाठी अर्ज दिला. पण अधिभार व भूभाडे तसेच दंडाची रक्कम भरली नाही, त्यामुळे महापालिकेने जप्त केलेल्या दुचाकी परत दिल्या नाहीत. मार्च महिन्यात महसूल विभागाने यासंदर्भात कंपनीकडे पाठपुरावा केला. पण कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 22 मार्चपासून बेळगावात लॉक डाऊन सुरू झाला, त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले. बाऊन्स कंपनीनेही आपला व्यवसाय बंद केला.

लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर बेळगाव शहरातील अन्य व्यवसाय सुरू झाले, पण बाऊन्स कंपनीने आपला व्यवसाय सुरू केलेला नाही. पालिकेच्या महसूल विभागाने त्याबाबत चौकशी केली असता कंपनीने बेळगावातून आपला गाशा गुंडाळला आहे असे समजले. पण जप्त केलेल्या दुचाकींबाबत अजूनही कंपनीने महापालिकेशी संपर्क साधलेला नाही. त्यामुळे पालिकेचा महसूल विभागही अद्याप स्वस्थ आहे. मुळात महापालिकेने 32 वाहने जप्त केल्यानंतरही कंपनीने बेळगावातील आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. पण पालिकेने वाहने जप्त करण्याच्या पुढे जावून कोणतीही कारवाई केली नव्हती. पण जप्त केलेल्या वाहनांची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्यस्थितीला पालिका आवारातील 32 पैकी 15 वाहने गायब आहेत.

संतोष अनिशेट्टर, महसूल अधिकारी. महापालिका- महापालिकेने बाऊन्स कंपनीच्या 32 दुचाकी जप्त करून मुख्य कार्यालयाच्या आवारात ठेवल्या आहेत. सर्व दुचाकी तेथेच आहेत. कंपनीकडून भूभाडे, वाहतूक अधिभार व दंड वसूल केल्यानंतरच दुचाकी परत दिल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

Parbhani Drought-Like Situation : पाणी, चारा, पीक पस्थितीचा आढावा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनास सतर्कतेचे निर्देश

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT