Fifteen years of meeting of father and children at Tuljapur 
कोल्हापूर

आणि तुळजापूर येथील पिता-मुलांची झाली पंधरा वर्षांनी कोल्हापुरात भेट

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अज्ञानात वाहनांच्या धडकेत वृद्ध व्यक्ती जखमी झाला. त्याला जीवनदान संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्याकडून माहिती घेऊन त्यांचा मुलगा, मुलगी यांचा शोध घेतला. यामुळे पंधरा वर्षानंतर पिता-पुत्राची भेट घडवून आणली. त्यासाठी प्रत्येक पातळीवर जीवनदान संस्थेने घेतलेल्या परिश्रमातून आजोबा स्वतःला सावरत आहेत.


सप्टेंबरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वृध्द व्यक्ती वाहनाच्या धडकेने विव्हळत पडल्याची माहिती राजू नांगरे यांनी जीवनदान संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांना दिली. त्यांनी तातडीने एकटी संस्थेच्या रुग्णवाहिकेतून त्यांना सावित्रीबाई फुले रुग्णालयात आणले, मात्र तेथील डॉक्‍टरांनी संबंधित व्यक्ती एकटीच असल्याने त्यांच्यावरील उपचारासाठी नकार दिला. तेव्हा श्री. खोडवे यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लीनाथ कल्लशेट्टी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार वृध्दाला फुले रुग्णालयात उपचार सुरू झाले. 


 श्री खोडवे यांनी विचारपूस करून कुटुंबाची माहिती घेतली. त्यांनी गंगाधर खंडा यमगर (रा. यमगरवाडी, ता. तुळजापूर) असे नाव सांगितले. त्यांच्याकडे मिळालेल्या दूरध्वनी क्रमांकावरून त्यांचा मुलगा परमेश्वर याच्याशी संपर्क साधत माहिती दिली. 
वडील जखमी असल्याची माहिती मिळाल्यानंतर बहीण लक्ष्मी यांच्यासोबत तुळजापूरहून कोल्हापुरात आले. त्यांची तब्बल पंधरा वर्षानंतर येथे वडिलांची भेट झाली. पंधरा वर्षांपूर्वी वडील मुलांपासून दूर गेले होते. त्यानंतर आजवर भेटल्याचा आनंद त्यांना झाला.

 श्री. खोडवे यांनी आजोबांना दवाखान्यात जेवण देण्यापासून व्यक्तीगत काळजी घेण्याचे काम केले. मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या सेवेत पंधरा वर्षांनंतर वडील व मुलांची भेट झाली. आजोबावर गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी श्री. खोडवे यांनी नगरसेवक राहुल चव्हाण, नियाज खान, आदीशी संपर्क साधून रक्त संकलन केले होते. खोडवे यांना जावेद इचलकरंजीकर,रविकिरण गवळी व अनिल व्हटकर, वसंत लिंगनूरकर, अक्षय बागडी, युवराज मुळीकर यांनी मदत केली.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT