Fifty four weight gold bracelet thief on three women kolhapur 
कोल्हापूर

पावणेचार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्या हातोहात: तीन महिला सीसीटीव्हीत कैद  

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: खरेदीचा बहाणा करून दुकानात आलेल्या तीन महिलांनी पावणेचार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या हातोहात पळविल्या. दसरा चौक परिसरातील एका ज्वेलर्समध्ये भरदिवसा हा प्रकार घडला. संशयित महिला सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली.

आज दुपारी तीनच्या सुमारास तीन महिला रिक्षातून तनिष्क ज्वेलर्समध्ये आल्या. सेल्समन सतीश यादव यांना तिघींनी सोन्याच्या बांगड्या खरेदी करायच्या असल्याचे सांगितले. ते तिघींना सोन्याच्या बांगड्या दाखवत होते. त्या वेळी त्यांची नजर चुकवून १ लाख ८६ हजार रुपये किमतीच्या ३७ ग्रॅमच्या दोन बांगड्या महिलांनी पळवल्या. हा प्रकार काही वेळाने यादव यांच्या लक्षात आला. त्यांनी याची माहिती मालकांना दिली.

दुकानातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यावर सोन्याच्या बांगड्या गायब करणाऱ्या तिघी सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसले. याबाबत यादव यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT