fight between two people on 150 rupees argument kolhapur 
कोल्हापूर

केवळ दिडशे रूपयांसाठे गड्याने काय केले वाचा 

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर (कोल्हापूर) - केवळ दीडशे रुपयांसाठी एकाच्या डोक्‍यात लाकडी ठोकळा घालून जखमी केल्याची घटना शहरात घडली. सुभाषकुमार प्रल्हाद भलाई (वय 32, जयसिंगपूर, मूळ गांव बाजोर, जि. सीकर राजस्थान) हा गंभीर झाला. घटनेनंतर संशयित आरोपी मुकेश वर्मा (भासावा राजस्थान) पसार झाला. घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. 

महेशकुमार रामलाल वर्मा यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महेशकुमार वर्मा यांच्याकडे संशयित मुकेश वर्मा आणि जखमी सुभाषकुमार भलाई कामगार आहेत. त्यांचे काम सध्या जयसिंगपूर व आरग (ता. मिरज) येथे सुरू आहे. कॉन्ट्रक्‍टरने 22 ऑगस्टला सुभाषकुमार भलाई यांच्याकडे पाचशे रुपये दिले. भलाई याने त्यातील शंभर रुपये मुकेश वर्मा याला दिले. या वेळी मुकेश वर्मा याने भलाई यांच्याकडे आणखी दीडशे रुपयांची मागणी केली. पैशांच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या वादातून संशयित आरोपी वर्मा याने सुभाषकुमार याला जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्‍यात लाकडी ठोकळा घालून जखमी करून त्यांना त्याच अवस्थेत सोडून फरारी झाला. 

फिर्यादी महेशकुमार वर्मा यांनी जखमीला मिरज येथील मिशन रुग्णालयात दाखल केले आहे. जयसिंगपूर पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT