filling of cow made by farmer couple in Pohale kolhapur 
कोल्हापूर

शेतकरी दांपत्याचा अनोखा उपक्रम: गावातील शंभराहून अधिक महिलांच्या उपस्थितीत केली राणी गायीची ओटी भरणी

निवास मोटे

जोतिबा डोंगर (कोल्हापूर) : ज्योतिबाच्या पायथ्याशी असणाऱ्या पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा या गावी मोहन पोवार व शोभा पोवार हे दांपत्य राहते. त्यांना पहिल्यापासून गाय म्हशी बैल या प्राण्यांविषशी प्रेम, माया, जिव्हाळा आहे. त्यांनी आपल्या गोठ्यात असणाऱ्या राणी नावाच्या गायीची चक्क ओटी भरणी करून एक नवीन पायंडा पाडला.  

ओटी भरणीचा कार्यक्रम गावातील पोवार माळ या ठिकाणी अगदी थाटामाटात साजरा झाला. राणी गायीची ओटी भरण्यासाठी  गावातील शंभराहून अधिक महिला उपस्थित होत्या. सर्व महिलांना या दांपत्यांनी चोळीचा खण, हळदी -कुंकू तसेच अल्पो आहाराची सोय केली होती.मोहन पोवार यांच्या गोठ्यात पिढीजात देशी गाय आहे. ते तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतात . या दांपत्याची थोडी शेती आहे त्यावरच त्यांची उपजीवीका चालते. 


देशी गायींचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. देशी गाय टिकली पाहीजे. शेतकऱ्याने एक तरी देशी गाय पाळली पाहिजे . देशी गायीचे मलमुत्र, शेण, दही, दूध, तूप ओषधी गुणाचे आहे . असे या दांपत्यांचे मत आहे .


गो हत्या थांबली पाहिजे. देशी गाय टिकली पाहीजे. देशी गायीच्या मलमुत्राचे ओषधी उपयोग आहेत . आम्ही गायीची ओटी भरली याचे कारण प्रत्येक शेतकऱ्यास देशी गायीविषयी  प्रेम निर्माण झाले पाहीजे.

मोहन पोवार ,सौ. शोभा पोवार,पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा .

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT