The film-style kidnapping went un-caught by the police 
कोल्हापूर

तेरा बच्चा मैरे पास आहे, पैसे लेके शेतकरी धाबेपर आ जाओ' , फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यास गेले अन पोलिसांच्या जाल्यात अडकले

राजेश मोरे

कोल्हापूर ः मुलाचे अपहरण करून "तेरा बच्चा मैरे पास आहे, पैसे लेके शेतकरी धाबेपर आ जाओ' अशी फिल्मीस्टाईने पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांचा छडा लावण्यात लक्ष्मीपुरी पोलिसांना यश आले. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली. समरजित गोरक्षनाथ घोरपडे (वय 19), अक्षय बळवंत चौगले (19, दोघे रा. बाचणी, करवीर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील मास्टर माईंडसह साथीदारांचा शोध सुरू आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती ः लक्षतीर्थ वसाहत येथून आठ वर्षांच्या मुलाचे सोमवारी (ता. 20) सायंकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी अपरहण केले. त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. पण, दोन तासांनी अपहरणकर्त्यांनी त्या मुलाला सोडून दिले. याबाबतची फिर्याद संदीप पाटील यांनी दिली. दाखल गुन्ह्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. 
असे केले अपहरण ः 
संशयित समरजित घोरपडेचे नातेवाईक लक्षतीर्थ वसाहत येथे राहतात. त्यामुळे त्याला पाटील यांच्या कुटुंबाची माहिती आहे. त्यांच्या आठवर्षीय मुलाशीही तोंडओळख होती. हा मुलगा भागात खेळत असतो. त्याला संशयित अक्षय चौगले व अन्य साथीदारांनी गाठले. त्याला गोट्या खेळण्याच्या बहाण्याने बोलवून मोटारसायकलवर बसवून त्याचे अपहरण केले. त्याला बोंद्रेनगर परिसरात नेले. तेथून पाटील यांना "तेरा बच्चा मैरे पास आहे, पैसे लेके शेतकरी धाबेपर आ जाओ' अशी फोनवरून धमकी दिली. त्यानंतर ते काही काळ रिक्षात बसून होते. त्यानंतर ते बाचणीकडे जाण्यास निघाले. त्याचवेळी पाटील हे त्यांच्या समोरून गेले. ते आपल्यालाच शोधत आहेत, असा समज अपहरणकर्त्यांचा झाला. त्यांनी संबधित मुलाला त्याच्या घरापासून काही अंतरावर सोडून दिल्याचे तपासात उघड झाले. 
असा लावला छडा ः 
एका अपहरणकर्त्याने टी शर्ट परिधान केला आणि अपहरणकर्त्यांनी बोंद्रेनगर परिसरातून धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिस कर्मचारी रोहित मर्दाने यांना खबऱ्याकडून मिळाली. हा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. टी शर्ट परिधान केलेला तरुण, त्याचा साथीदार हे दोघे बाचणी येथील असल्याची माहिती पुढे आली. पोलिसांनी संबधितांच्या घरातून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी आपली नावे अक्षय चौगले, समजित घोरपडे असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली दिली. यात मास्टर माईंडसह अन्य साथीदार असल्याची माहिती पुढे आली. त्या दोघांना न्यायालयाने 25 जुलैपर्यंत कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल गुजर, उपनिरीक्षक सुनीता शेळके, कर्मचारी नामदेव पाटील, तानाजी गुरव, योगेश शिंदे, रोहित मर्दाने, अमित जाधव यांनी केली. 

मास्टर माईंड अल्पवयीन 
संशयित समरजित व अक्षय हे दोघे सामान्य कुटुंबातील असून, त्यांचे नववी व दहावीपर्यंत शिक्षण झाले. ते दोघे "एमआयडीसी'त नोकरी करतात. गुन्ह्यातील मास्टर माईंड अल्पवयीन असून, सुरवातीला 13 लाखांची खंडणी मागण्याचा प्लॅन होता. ही रक्कम संशयित आपापसात वाटून घेणार होते, असे तपासात पुढे येत असल्याचे उपनिरीक्षक शेळके यांनी सांगितले. 
संपादन -यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT