The final examination of 10th-12th is in the month of April 
कोल्हापूर

दहावी -बारावीच्या अंतिम परीक्षा एप्रिल महिन्यात 

मतीन शेख

कोल्हापूर : कोरोना महामारीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करावा लागला परंतू या वर्षी १० वी व १२ च्या अंतिम परीक्षा नेमक्या कधी होणार असा प्रश्न असतानाच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एप्रिल महिन्यात या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्या कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होत्या.

 त्या म्हणाल्या, १० वी आणि १२ च्या विद्यार्थ्यांची अंतीम परिक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर अथवा शेवटच्या आठावड्यात घेण्याचा विचार आहे. या संबंधी परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. काही दिवसापुर्वी ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांचे वर्ग शासनाने सर्व खबरदारी घेत सुरु केले. जवळपास १७ ते १८ लाख विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात हजर राहिले. आता याच धर्तीवर सर्व खबरदारी घेत २७ जानेवारी पासून ५ वी ते ८ चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये ही या मागची भुमिका आहे.

 मंत्री वर्षा गायकवाड यांनी अंतिम परीक्षेच्या संबंधी दिलेल्या या माहितीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यास मदत झाली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT