Final interviews for the post of Vice Chancellor of Shivaji University today 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या आज अंतिम मुलाखती

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा अंतिम टप्पा उद्या (ता. 5) होणार आहे. यात अंतिम यादीतील पाच उमेदवारांशी कुलपती संवाद साधतील. यासाठी प्रत्येकाला वेगळी वेळ देण्यात आली आहे. या मुलाखती ऑनलाईन होतील. कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेतील शोध समितीचे काम संपले. त्यांनी पाच उमेदवारांची यादी बंद पाकिटातून कुलपती कार्यालयाकडे दिली. यात शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, "एनएमआयएमआय'चे अधिष्ठाता डॉ. नितीन देसाई, प्रा. डॉ. अंजली कुरणे, प्रा. डॉ. के. व्ही. काळे, प्रा. डॉ. अविनाश कुंभार यांची नावे अंतिम यादीत होती. या प्रत्येकाला कुलपती कार्यालयाकडून वेळ देण्यात आली आहे. सोमवारी दुपारनंतर या मुलाखती होतील. उमेदवारांच्या आडनावातील आद्याक्षराप्रमाणे उमेदवारांच्या मुलाखतीचा क्रम ठरविण्यात आला. कुलपती प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत. त्यानंतर अंतिम नावाची निश्‍चिती होईल. 
हे ठरणार महत्त्वाचे 
आतापर्यंत झालेल्या प्रक्रियेत शोध समितीने उमेदवारांचे संशोधन, त्यांचे प्रबंध, अध्यापनाचा अनुभव, व्यावस्थापनातले काम या सर्वांची माहिती घेतली आहे. त्यानंतरच पाच जणांची निवड करण्यात आली. कुलपतींच्या मुलाखतीत त्यांचा भर हा उमेदवाराच्या विद्यापीठाच्या प्रगतीबाबत असणाऱ्या भविष्यकालीन योजना, विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या परिसराची भौगोलिक, सांस्कृतिक, औद्योगिक आणि सामाजिक माहिती, त्या अनुषंगाने असणारा उमेदवारांचा दृष्टिकोन या बाबींवर असतो. याची पडताळणी करून मग अंतिम निवडीचे नाव निश्‍चित केले जाते. 
- संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या दोन सामन्यांत संधी नाही, पण आता वैभव सूर्यवंशीची बारी? श्रेयस अय्यरच्या वक्तव्याने समीकरण बदललं; तिसऱ्या T20 मध्ये खेळणार?

Bhandara Tragedy : पती पाठोपाठ एका तासात पत्नीचाही मृत्यू एकाच सरणावर दोघांवरही अंत्यसंस्कार

Solar Panel: 5kW सोलर पॅनलवरून महिन्यात किती युनिट वीज तयार होते? सबसिडी किती मिळते? पाहा संपूर्ण गणित!

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

Health: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी HPV लसीकरणावर भर; NCD मॉडेलमध्ये डिजिटल ट्रॅकिंगचाही समावेश

SCROLL FOR NEXT