Final year examination finished of Shivaji University 
कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा निर्विघ्नपणे; १०० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आज निर्विघ्नपणे पार पाडल्या. २७ ऑक्‍टोबर ते १० नोव्हेंबर कालावधीत एकूण १७२ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पूर्ण झाल्या. आत्तापर्यंत १०० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये आज जाहीर केलेल्या २९ अभ्यासक्रमांच्या निकालांचाही समावेश आहे. आज ६०४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर ४ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली.


अंतिम वर्षांच्या परीक्षा म्हणजे अडथळ्यांची शर्यतच झाल्या होत्या. मुळातच सॉफ्टवेअर खरेदीला उशीर झाला. १७ ऑक्‍टोबर रोजी या परीक्षा होणार होत्या. त्यानंतर त्या २१ ऑक्‍टोबरला होणार, असे जाहीर केले. त्यानंतर चक्रीवादळामुळे या परीक्षा २७ ऑक्‍टोबर रोजी घेणार असल्याचे जाहीर झाले. विद्यापीठाने घेतलेल्या सराव परीक्षेतही बराच गोंधळ झाला. त्यानंतर मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाच्या पातळीवर विविध उपाययोजना करून अंतिम वर्षाच्या परीक्षांना सुरुवात केली. यासाठी विद्यापीठाने आपत्ती निवारण कक्षही उभारला होता. पंधरा दिवसांत सुमारे १७२ अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या. त्यातील १०० परीक्षांचे निकालही जाहीर केले. या कालावधीत किरकोळ अपवाद वगळता कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. 


दरम्यान, आज ६०४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली तर ४ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. पहिल्या सत्रात एम.बी.ए. अभ्यासक्रमाची परीक्षा झाली. दुसऱ्या सत्रात एम.एस.सी व एम.बी.एची परीक्षा झाली. आज सुमारे २९ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मिरा भाईंदर जैनांची नगरी, भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद; उलटे-सुलटे धंदे बंद करण्याचा मनसेचा इशारा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेत जयंत पाटलांचा 'अकरा प्लस'चा डाव, अध्यक्षपदासाठी चुलत भावाचंही नाव; आमदार पडळकरांचा गंभीर आरोप

Bajrang Sonawane : 'विलास घुले प्रकरणात माझ्या मुलाला अडकवण्याचा वाल्मिक कराडचा डाव', बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप; कथित कॉल रेकॉर्डिंग ऐकवली

Mumbai Weather: मुंबईकरांनो सावधान! पुढचे ७२ तास घराबाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Latest Marathi News Live Update : शरद पवार उद्यापासून दुष्काळ दौऱ्यावर; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT