Finally Came The Biogas Subsidy After A Year! Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

...अखेर वर्षभरानंतर बायोगॅसचे अनुदान आले! 

अवधूत पाटील

गडहिंग्लज : शासनाकडून अनुदान मिळणार याची खात्री असल्याने बायोगॅस बांधले. मात्र, वर्षभर अनुदान आलेच नाही. त्यात यंदाच्या लाभार्थ्यांना अनुदान मिळाल्याने गतवर्षीचे जिल्ह्यातील 380 लाभार्थी गॅसवर होते. "सकाळ'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करीत लक्ष वेधले होते. अखेर अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची वर्षभराची प्रतीक्षा संपली आहे. 2019-20 मधील अनुदान जिल्हास्तरावर आले आहे. येत्या दोन दिवसात लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर जमा होण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत बायोगॅस बांधणीसाठी अनुदान दिले जाते. खुल्या प्रवर्गात 12 हजार रुपये तर मागासवर्गीयांना 13 हजार रुपये दिले जातात. बायोगॅससोबत शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांना 1600 रुपये जादा मिळतात. सन 2019-20 मध्ये जिल्ह्यातील 1070 लाभार्थ्यांनी बायोगॅस उभारली. मात्र, केंद्राने आपल्या वाट्याचा निधीच दिला नाही. राज्याने स्वनिधी रिता केल्याने दोन टप्प्यात 690 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ झाला. मात्र, उर्वरित 380 लाभार्थ्यांना बायोगॅस अनुदानाची प्रतीक्षाच होती. 

मूळात बायोगॅस बांधकामासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो. त्या तुलनेत अनुदानाची रक्कम 30 ते 35 टक्के आहे. तेही वर्षभरापासून न मिळाल्यामळे लाभार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. अनुदान मिळण्यात कोरोनाचा अडथळा आल्याचे प्रशासकीय पातळीवरुन सांगण्यात येत होते. "बायोगॅसचे लाभार्थी गॅसवर' या मथळ्याखाली 1"सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करीत या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. दरम्यान, आता शासनाकडून सन 2019-20 च्या रखडलेल्या अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 380 लाभार्थ्यांची वर्षभरापासूनची प्रतीक्षा संपली आहे. 

दोन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर
बायोगॅसचे सन 2019-20 मधील अनुदान शासनाकडून मिळाले नव्हते. त्यामुळे 380 लाभार्थी वंचित होते. मात्र, आता शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. दोन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल. 
- चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT