Find out if water has to be used sparingly in Kolhapur on Monday 
कोल्हापूर

कोल्हापुरात सोमवारी पाणी जपून वापरावे लागणार का ? ते जाणून घ्या

डॅनिअल काळे

कोल्हापूर  ः बालिंगा पंपींग स्टेशनजवळील संपाची गळती काढण्याचे काम तसेच जुने आपटेनगर पंपींग स्टेशनकडे जाणाऱ्या गुरूत्ववाहिनीवरील व्हॉल्व बदलण्याचे काम सोमवारी (ता.17) करण्यात येणार आहे. परिणामी या दिवशी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तसेच मंगळवारी (ता.18) होणारा पाणी पुरवठा हा अपुरा व कमी दाबाने होईल. 
शहरातील ए बी सी डी वॉर्डमधील संपूर्ण परिसर फुलेवाडी रिंगरोड परिसर, त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग, सानेगुरूजी वसाहत परिसर, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर परिसर, कणेरकरनगर परिसर, क्रांतीसिंहनाना पाटील नगर परिसर, तुळजाभवानी कॉलनी परिसर, क्रशर चौक परिसर, देवकर पाणंद परिसर, रंकाळा रोड परिसर, शिवाजीपेठ काही भाग, शनिवारपेठ परिसर, पापाची तिकटी परिसर, बुधवारपेठ तालिम परिसर, सोमवारपेठ परिसर, लक्ष्मीपुरी परिसर, आझादचौक परिसर, बिंदुचौक परिसर, महालक्ष्मी मंदीर परिसर इत्यादी भागातील नळ कनेक्‍शनधारकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा अपूरा व कमी दाबाने होणार आहे. 
तरी या भागातील नागरीकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टॅंकरव्दारे पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. नागरीकांनी पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

संपादन -यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT