Fire in CPR covid hospital in kolhapur reason short sircit but no any mortality in fire 
कोल्हापूर

ब्रेकिंग : कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात आग ; रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवले

शिवाजी यादव

कोल्हापूर : सीपीआरमधील ट्राॕमा आयसीयु मधिल एका कक्षा मध्ये इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शाॕर्ट सर्किट झाल्याने आज पहाटे आग लागली. या कक्षातील १५ रुग्णांना वेळीच सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आले. केवळ एकाचा हात भाजला आहे.  कोणत्याही प्रकारची जिवितहानी किंवा दुखापत झाली नाही, अशी माहिती अधिष्ठाता डाॕ चंद्रकांत मस्के यांनी दिली. दरम्यान आगीत  चार रुग्णांचा मृत्यू झाला अशी अफवा पसरल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

 जिल्ह्यातील पूर्णवेळ  कोरोना रूग्णालय म्हणून कार्यरत असलेल्या सीपीआरमध्ये आज पहाटेच्या सुमारास  व्हेंटिलेटरला आग लागली. सुरक्षारक्षकांनी वेळीच धाव घेत ही आग विझवली आहे . याचवेळी अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

मात्र ज्या वॉर्डमध्ये आग लागली त्या वॉर्डात पंधरा रुग्ण उपचार घेत होते. त्यांना अन्य विभागात हलविण्यात आले आहे. कोवीड  रुग्णालयातच आग लागल्याने सीपीआर परिसरात खळबळ उडाली.  सध्या सीपीआर रुग्णालयात 270 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे कोरोना बाधित आहेत. तसेच अनेक रुग्णांची  प्रकृती गंभीर आहे.

गंभीर रुग्णांवरही सध्या उपचार होत आहेत अनेक रुग्णांना गुंतागुंतीच्या आजाराची लक्षणे आहेत तसेच श्वसनाचा त्रास तीव्र होत असल्याने व्हेंटिलेटर लावावे लागते. जवळपास 150 हून अधिक व्हेंटिलेटर सीपीआरमध्ये बसवण्यात आली आहेत. यातील काही  सदोष होती त्यासाठी  कंपनीने ती दुरुस्त करून द्यावी यासाठी  पाठपुरावाही केला होता. मात्र काही व्हेंटिलेटर दुरुस्त झाली व मोजकीच काही व्हेंटिलेटर  दुरुस्त झालेली नाही. तरीही एकूण रुग्णांच्या वाढता ओघ आणि व्हेंटिलेटरचा वापरही वाढत होता. अशातच एका  व्हेंटिलेटर ने आज पेट घेतला.यावेळी
 तातडीने सुरक्षारक्षकांनी धाव घेत  घटनास्थळी  महापालिका अग्नाीशामक दलाचा बंब पोहचला अणि  तातडीने मदत कार्य सुरू झाले. पंधरा  रुग्णांना अन्य वॉर्डमध्ये हलविण्यात आले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT