Fire extinguished by soldiers fathers and son in kolhapur 
कोल्हापूर

महाराजांची मिरवणूक संपताच पिता-पुञ जवानांनी विझवली घरामध्ये लागलेली आग...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - राज्यभरात सर्वत्र शिवजयंतीचा उत्सव आनंदात सुरू होता व महाराजांच्या मिरवणूका सुरू असताना काल सायंकाळी कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेत एका घरामध्ये सिलेंडर लिकेज होऊन आग लागली होती. आग लागताच स्थानिकांनी तेथील अग्निशमन दलाशी संपर्क साधला. परंतु, तेथेच शेजारी राहणारे व २०१३ साली सेवानिवृत्त झालेले कोल्हापुर अग्निशमन दलाचे जवान दिलीप माने व पुणे अग्निशमन दलामधे कार्यरत असलेले व सध्या सुट्टी करिता घरी आलेले त्यांचे पुञ जवान धर्मराज माने यांनी धाव घेऊन आग विझवत पिता व पुञ दोघांनी कर्तव्य चोख बजावले. 

आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला

काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिवाजी पेठेत एका अरुंद गल्लीमधे असणारया घरात अचानक गॅस सिलेंडर लिकेज होऊन आग लागल्याची घटना घडली. काही क्षणातच आगीची तीव्रता वाढताच रहिवाशांना आरडाओरडा सुरू केला.
त्याचवेळी नुकतीच शिवरायांची मिरवणूक संपवून आलेले व शेजारी राहणारे माने कुटूंबिय यांनी आगीकडे धाव घेतली.  घरामध्ये असलेल्या पाईपच्या साह्याने पाणी मारून आग आटोक्यात आणत लिकेज गॅस सिलेंडर बंद करत तातडीने बाहेर घेतला. तोपर्यंत अग्निशमन दलाचे वाहन ही दाखल झाले व त्यांनी पुढील काम करीत आग पुर्ण विझवली. सदर आगीमधे घराचे नुकसान झाले असून कोणी जखमी नाही. वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. 

पिता - पुञ या दोघांनी केलेल्या कामगिरीचे विषेश कौतुक  स्थानिक व कोल्हापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. आपल्या वडिलांची या वयात असणारी तत्परता व चलाखी पाहून "जवान सेवानिवृत्त झाला तरी त्याच्या अंगी आपले कर्तव्य चोख बजावण्याची कुवत असते" असे त्यांचे पुञ पुणे अग्निशमन दलाचे जवान धर्मराज माने यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT