कोल्हापूर

कोल्हापुरात कळंबा तलाव परिसरात गोळीबार; तरूणी जखमी

राजेश मोरे

कळंबा (कोल्हापूर) : कळंबा तलाव परिसरात आज सकाळी एअर गनने झालेल्या हल्ल्यात एक तरूणी जखमी झाली. त्यामुळे गोंधळ आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी तरूणीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. हा प्रकार एकतर्फी प्रेमातून घडल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

कळंबा तलाव परिसरात आज सकाळी एअर गनने झालेल्या हल्ल्यात एक तरूणी जखमी झाली.

याबाबत घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,

शहरातील एक तरूणी तिच्या नातेवाईकासोबत आज सकाळी कळंबा तलाव परिसरात गेली होती. त्याचवेळी तिच्यावर एअर गनने हल्ला झाला. त्यात ती किरकोळ जखमी झाली. त्यावेळी झालेल्या ओरड्याने नागरिक जमा झाले. तसा हल्लेखोर तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून किरकोळ जखमी झालेल्या तरूणीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

दरम्यान हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून हल्लेखोराचा शोध पोलिसांनी सुरू केला. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT