first corona death police sanjeet jagtap in kolhapur and police officers encourage to other police 
कोल्हापूर

'धास्ती न घेता समाजासाठी लढायचे आणि जिंकायचेच'

सकाळ वृत्तसेवा

नागाव : कोरोना संदर्भात वेळोवेळी मिळणार्‍या सूचनांचे काटेकोर पालन करुन आपण आपली सेवा बजावली पाहिजे अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी दिल्या. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयोजित कोरोना योद्धे पोलिस हवालदार संजीत जगताप यांच्या शोकसभेत ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते. 

डॉ. वारके म्हणाले, पोलिस कर्मचाऱ्यांनी धास्ती न घेता समाजासाठी लढायचे आणि जिंकायचे आहे. पोलिस हवालदार संजीत जगताप यांच्या कुटुंबासाठी पोलिस दलाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य आपण करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला.

कोरोनाची लढाई प्रदीर्घ चालणार आहे. त्यामुळे खचून चालणार नाही, असे मत डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, काळजी घेऊन स्वतःला झोकून घ्यावे लागणार आहे. संकट मोठे आहे. मानसिक दृष्ट्या निर्धाराने याला सामोरे जावे. आजाराला घाबरण्याचे कारण नाही. पण आपल्या शरीरावर त्याची लक्षणे काय परिणाम करतील याबाबत शाश्वतपणे सांगता येत नाही. अशा प्रकारच्या संकटात जिल्हा पोलिस दल आपल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल असा विश्वास डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला. 

यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.  
यावेळी पोलिस निरीक्षक किरण भोसले, पोलिस उपनिरीक्षक एस. एस. लोखंडे, सहायक फौजदार आर. बी. ठाणेकर, ए. बी. पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.  

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT