कोल्हापूर

जिल्ह्यातला पहिलाच उपक्रम! माणगावकरांनी साकारले पहिले लहान मुलांचे डिजिटल कोविड सेंटर

सागर कुंभार

रुकडी (कोल्हापूर) : कोरोनाची तिसरी लाट (Third wave of covid 19)उद्भवल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत लहान मुलांवरील उपचारासाठी माणगाव (ता.हातकणंगले) (Mangaon)येथील ग्रामपंचायतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले डिजीटल लहान मुलांचे कोव्हिड केअर सेंटर (children covid care center) तयार केले आहे.यामध्ये १५ बेड ची व्यवस्था केली असून दहा ऑक्सिजन बेड तयार केले आहेत.लहान मुलांची मानसिकता त्यांच्या आवडीनिवडी या सर्व गोष्टींचा विचार करुन खेळणी घरासारखी कोव्हिड केअर सेंटरची रचना केली आहे. मुलांना उपचारा दरम्यान दवाखान्याची भीती वाटणार नाही यापद्धतीने आकर्षकरित्या या सेंटरची उभारणी केली आहे.(first-digital-children-covid-care-center-in-mangaon-kolhapur-covid-19-update)

दरम्यान,कोरानोच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका पोहोचण्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सदर कोव्हीड केअरची निर्मिती करत असताना मुलांच्या मनोरंजनासाठी कार्टून्स व गमंतजमंतसाठी टीव्ही उपलब्ध करू दिला आहे. डिजिटलच्या माध्यमातून छोटा भीम,पक्षी व निसर्गाची अनुभूती मुलांना घडविण्याचा प्रयत्न केला आहे.लहान मुलांचे हे जिल्ह्यातील पहिलेच कोव्हिड केअर सेंटर असल्याचा दावाही ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ए.पी.मगदूम हायस्कूलमध्ये'स्वर्गीय सरोज दादासाहेब पाटील’यांच्या नावांनी हे सेंटर सुरू केले आहे.

हेही वाचा- 'नही जायेंगे काम को, क्या खायेंगे शाम को'; कोल्हापुरात व्यापारांचे अनोखे आंदोलन

‘संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी व लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षिततेला प्राधान्य देत मुलांसाठी कोव्हिड केअर सेंटरची उभारणी केली आहे. या सेंटरमध्ये एकूण १५ बेड आहेत. त्यापैकी दहा बेड ऑक्सिजनयुक्त आहेत.डिजिटल चित्र,कार्टून्सच्या माध्यमातून कोव्हिड केअर सेंटरला वेगळे रुप दिले आहे.मुलांना आनंददायी वातावरणात उपचार व्हावेत,त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही भावना आहे.’

राजू मगदूम,सरपंच, माणगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT