The first rickshaw of Raju Khatif, Sadiq Pirjade 
कोल्हापूर

राजू खतिफ, सादिक पिरजादेंची रिक्षा पहिली

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धेत नवीन गटात कोल्हापूरच्या राजू नौशाद खतिफ, तर जुन्या गटात बेळगावच्या सादिक पिरजादे यांच्या रिक्षाने पहिला क्रमांक पटकाविला. महाराष्ट्र रिक्षा चालक सेना प्रणित निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे निवृत्ती चौकात स्पर्धा झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते. 

प्रताप देसाई, गणेश देवणे, विजय गायकवाड, चंद्रकांत भोसले, सुभाष पाटील व राजेंद्र जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, पुणे, बेळगाव, पंढरपूर, नवी मुंबईतील रिक्षा चालक स्पर्धेत सहभागी झाले होते. रिक्षांना अत्यंत नेटकेपणाने सजवून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. नव्या गटात बेळगावच्या मुस्ताक अहमद पठाण यांनी द्वितीय, पंढरपूरच्या मोहन लाड यांनी तृतीय, तर कऱ्हाडच्या सागर शिंदे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. जुन्या गटात कोल्हापूरचे शिवानंद वरूटे यांनी द्वितीय, तर बेळगावच्या युसूफ पिरजादे यांनी तृतीय क्रमाकं मिळविला. बेळगावच्या संतोष बाळू यांच्या रिक्षाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. या प्रसंगी इम्रान जमादार (विक्रमनगर), प्रसाद तोरस्कर (फुलेवाडी), संभाजी रणदिवे (शिवाजी चौक), सुधीर पाटील (बालगोपाल तालीम), विजय सावंत (देवकर पाणंद), सर्जेराव गौड (कळंबा) या प्रामाणिक रिक्षा चालकांचा सत्कार झाला. 

आमदार चंद्रकांत जाधव, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय देवणे, सुजित चव्हाण, चंद्रकांत भोसले, अशिष मांडवकर, धनाजी सावंत, मोहन बागडी, विजय गायकवाड, तेजस जाधव, रितेश जाधव यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. विलास गवळी, मनोज दरेकर, मुकुंद श्रीखंडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सुनील मगदूम, उदय देशमाने, साहेब पोवार, दीपक पोतदार, राजू कापूसकर, सचिन पोवार, शाम कापूसकर आदी उपस्थित होते. भालचंद्र काणे यांनी सूत्रसंचालन केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT