Fishermen say, let it rain, let it rain ...! 
कोल्हापूर

मच्छीमार म्हणतात, पाऊस पडू दे, कळंबा भरू दे...! 

संजय दाभाडे

कळंबा : मत्स्य व्यवसाय वाढीसाठी कळंबा तलावात मच्छीमारांकडून विविध जातींचे चार लाख मत्स्यबीज सोडले जाणार आहेत. यासाठी येथील मच्छीमारांनी परजिल्ह्यातील मत्स्य बीज उत्पादन संस्थेकडे मत्स्यबीज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, बेसुमार पाणी उपशामुळे तलावाचे पात्र मोठ्या प्रमाणात कोरडे पडले आहे. तसेच पावसानेही उघडीप दिली आहे. त्यामुळे मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन तलाव तुडुंब भरण्याची गरज आहे. त्याकडे मच्छीमारांचे लक्ष लागून राहिले आहे. 

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये तलावात रोह, कटला, मिरगल शेंगाळा, टिलाप यांसह अनेक जातीची चार लाख मत्स्यबीजे सोडली जाणार आहे. यासाठी येथील मच्छीमारांनी धोम, हडपसर, उजनी आदी ठिकाणी मत्स्यबीज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पावसाळा सुरू होऊन दीड महिना संपत आला आहे. तरीही कळंबा तलावाच्या पाणी पातळी मोठी घट जाणवत आहे. मत्स्य बीजांची वाढ होण्यासाठी पावसाच्या पाण्याने तलाव तुडुंब भरण्याची गरज आहे. त्यामुळे पावसाकडे मच्छीमारांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, कळंबा तलावातील मासेमारीवर दहा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. 

मत्स हंगामात फटका... 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाउन केल्याने अनेक फिश मार्केट, हॉटेल, रेस्टॉरंट काही काळासाठी बंद ठेवले होते. त्याचबरोबर परप्रांतीय मजूर आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे यंदाच्या मत्स्य हंगामात मासे विक्रीत घट झाल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. 

कळंबा तलावात मुबलक पाणीसाठा झाल्यानंतर मत्स्यबीज सोडण्यात येणार आहेत. तसेच उत्तम दर्जाचे मत्स्यबीज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 
- अंकुश गुजर, अनिल ठोंबरे, मच्छीमार 

दृष्टिक्षेप 
- परजिल्ह्यातून मत्स्य बीज मिळवण्याचे प्रयत्न 
- बेसुमार पाणी उपशामुळे कळंबा तलाव कोरडा 
- मुसळधार पावसाकडे मच्छिमारांचे लक्ष 
- मासेमारीवर चालतो दहा कुटुंबांचा उदरनिर्वाह 

संपादन : प्रफुल्ल सुतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर आहे खास...आज एक दोन नव्हे तर तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस 'Birthday Special-11' एकदा वाचाच...

DK शिवकुमार-जारकीहोळी भेटीमागचे राजकारण गडद; सत्तावाटपावरून काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली, संक्रातीपर्यंत निर्णय होणार?

SCROLL FOR NEXT