कोल्हापूर

सावधान! कोल्हापुरातील पाच भाग कोरोना हॉटस्पॉट; महापालिका प्रशासनाचे लक्ष

परजिल्ह्यातून या भागात आलेल्या नागरिकांचीही नोंद ठेवली जाणार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बाधित तुलनेत अधिक सापडत असलेल्या पाच भागांवर महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. तेथे औषध फवारणी करणे, अधिक रुग्ण सापडणारी इमारत आणि परिसर कंटेन्मेंट झोन करणे अशा विविध उपाययोजना प्रशासनाकडून सुरू आहेत. एप्रिलच्या पंधरा दिवसांत शहरात एक हजार ७७६ रुग्ण वाढले आहेत. कोविड नियंत्रणात महापालिकेला गेल्या वर्षी लक्षणीय यश आले होते.

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे अलगीकरण, कंटेन्मेंट झोन, कोविड सेंटर यामुळे फेब्रुवारीत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या बहुतांशी कमी आली होती. मार्चमध्ये पुन्हा संख्या वाढू लागली. महिन्याभरात संख्या सहाशेपर्यंत गेली. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आकडा सुमारे एक हजारपर्यंत गेला. शहरातील काही ठराविक भागांत रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने पाच भाग निश्‍चित केले आहेत. येथे पोलिसांच्या मदतीने कंटेन्मेंट झोन केले जाणार आहेत. या परिसरात औषध फवारणी, येथील रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचे स्वॅब टेस्टिंग अशा विविध उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. परजिल्ह्यातून या भागात आलेल्या नागरिकांचीही नोंद ठेवली जाणार आहे.

"रुग्णसंख्येचा आढावा घेऊन शहरातील पाच भाग निश्‍चित केले आहेत. येथे पोलिसांच्या मदतीने कंटेन्मेंट झोन तयार केले जातील. तेथील रुग्णसंख्या कमी होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली जाईल."

- निखिल मोरे, उपायुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT