Shivsena Sakal
कोल्हापूर

शिवसेनेचे पाच माजी आमदार गोव्यात

जिल्ह्यात उलटसुलट चर्चा : पाचही माजी आमदार शिंदे समर्थक

विकास खिलारी

कोल्हापूर - राज्याचे नगरविकास मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या ३० ते ३५ आमदारांसह सुरत गाठून पक्ष नेतृत्त्वालाच आव्हान दिले असतानाच जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच माजी आमदारांनी गोवा गाठल्याने उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. या दौऱ्याला कोणतीही राजकीय पार्श्‍वभुमी नसल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या गोवा दौऱ्याने जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गोव्याला गेल्या पाच माजी आमदारांपैकी चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकी वेळीच जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शिवसेनेवर अन्याय होत असल्याची तक्रार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर केली होती. या आरोपाच्या पार्श्‍वभुमीवर त्यांच्यासह नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार उल्हास पाटील, सत्यजित पाटील-सरूडकर व डॉ. सुजित मिणचेकर यांचा गोवा दौरा चर्चेत आला आहे.

राज्यसभा व विधान परिषदेत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर राज्यात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. काल विधान परिषदेचा निकाला लागल्यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या ३० ते ३५ आमदारांसह सुरत गाठले आहे. त्यांच्यासोबत कोल्हापुरचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, सांगलीचे अनिल बाबर व साताराचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या या पाच आमदारांच्या बंडाने खळबळ उडाली असतानाच जिल्ह्यातील सेनेचे पाच माजी आमदार गोव्यात गेले आहेत.

गोव्याला गेलेल्या पाचही माजी आमदारांचा २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. यातील क्षीरसागर, नरके, डॉ. मिणचेकर यांचा काँग्रेस आमदारांनी तर सरूडकर यांचा ‘जनसुराज्य’ चे डॉ. विनय कोरे, उल्हास पाटील यांचा अपक्ष उमेदवार व राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पराभव केला. विधानसभेच्या निकालानंतर राज्यात शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडीचे सरकार आले.

जिल्ह्यात शिवसेनेच्या माजी आमदारांसह प्रमुख कार्यकर्त्यांना दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांकडून फारशी चांगली वागणूक मिळालेली नाही. तशी जाहीर वाच्यता श्री. नरके यांच्यासह श्री. क्षीरसागर व अन्य माजी आमदारांनी जाहीर कार्यक्रमात केली होती. यातील श्री. क्षीरसागर यांचे पद कायम राहीले पण इतरांना विश्‍वासातच घेतले जात नाही अशी स्थिती आहे.

मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्रीच सर्व समर्थक आमदारांना ठाणे येथील फार्म हाऊसवर एकत्र केले व तेथून ते सुरत गेला. त्यानंतर काल रात्रीच हे माजी आमदार गोव्याला गेले. यावरून त्यांना या बंडाची माहिती होती की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गोव्याला गेलेले जिल्ह्यातील सेनेचे पाचही माजी आमदार हे श्री. शिंदे समर्थक असल्याचे बोलले जाते.

रविवारी (ता. १९) श्री. क्षीरसागर यांच्या ‘शिवालय’ या कार्यालयाचे उदघाटन झाले, त्या कार्यक्रमाला आम्ही सर्वजण एकत्र होतो. त्याचठिकाणी चला गोव्याला जाऊ अशी टूम निघाली, त्यातून आम्ही काल सकाळी गोव्याला आलो. राज्यात झालेला राजकीय भूकंप आमि आमचा गोवा दौरा याचा काही संबंध नाही, तसा हा योगायोग समजावा. पण यापुर्वी सेनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात आपण काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जिल्ह्यात शिवसेनेला सहकार्य होत नसल्याचा आरोप मी केला होता, अशी प्रतिक्रिया गोव्याला गेलेले माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT