Kalammawadi Dam in Kolhapur esakal
कोल्हापूर

Kolhapur : महाराष्ट्रातून कर्नाटकला पाणी पुरवठा करणाऱ्या 'या' धरणाचे 5 दरवाजे बंद; 1 हजार क्युसेकने विसर्ग सुरू

धरणात २०.५८ टीएमसी पाणीसाठा, तर धरण भरले ८१ टक्के

सकाळ डिजिटल टीम

धरणाच्या वक्राकार दरवाजातून शुक्रवारपासून बाराशे क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला होता.

राधानगरी : पावसाचा जोर ओसरल्याने पाणलोट क्षेत्रातून होणारी पाण्याची आवक कमी झाली असून काळम्मावाडी धरणाच्या (Kalammawadi Dam) सांडव्यावरून होणारा पाणी विसर्ग बंद झाला आहे.

पाणी पातळी स्थिर राहिल्याने, धरणाचे पाचही वक्राकार दरवाजे नुकतेच बंद करण्यात आले. दरम्यान, काल रात्री धरणस्थळावरील वीज केंद्रातून वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. केंद्रातील दोन पैकी एक जनित्र संच कार्यान्वित करण्यात आला आहे.

आता पायथ्याच्या वीजगृहातून वीज निर्मितीसाठी सोडलेल्या १००० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल सायंकाळी धरणात २०.५८ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ८१ टक्के भरले आहे. धरणाच्या वक्राकार दरवाजातून शुक्रवार (ता. ४) पासून बाराशे क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

SCROLL FOR NEXT