Five hundred rupees will be collected Accounts under the Pradhan Mantri Jan Dhan Yojana  
कोल्हापूर

खुशखबर 'त्या' महिलांच्या खात्यांवर जमा होणार पाचशे रुपये

सुनील पाटील

कोल्हापूर : प्रधानमंत्री जन-धन योजनेतंर्गत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर एप्रिल, मे व जून अशा तीन महिने प्रती महिना पाचशे रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत जमा केली जाईल. यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम या महिन्यात संबंधीत महिलांच्या खात्यावर वर्ग केली जाईल. सध्या सुरू असलेल्या कोविड-साथीमुळे बॅंक शाखांमध्ये आणि ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने दिवस आणि वेळेचे नियोजन केले असल्याची माहिती अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहूल माने यांनी केले.

 याबाबत बोलताना माने म्हणाले, शुक्रवारी (ता. 3) ज्यांचा खाते क्रमांकांचा शेवट 0 किंवा 1 ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. शनिवारी (ता. 4) 2 किंवा 3 ने शेवट होणाऱ्या खाते क्रमांकावरील पैसे काढता येणार आहेत. रविवार (ता. 5) साप्ताहिक आणि सोमवारी (ता. 6) महावीर जयंतीची सुट्टी असल्यामुळे व्यवहार बंद राहतील. मंगळवारी (ता. 7) 4 ते 5 या क्रमांचे, बुधवारी (ता. 8) 5 ते 6, गुरूवारी (ता.9) 6 ते 7 ज्या खाते क्रमांकांचा शेवट किंवा ने होतो त्या खात्यांतील रक्कम काढता येईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंना ठोकायला ११ लोकांची टीम; मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत राजेंद्र कोंढरेंच्या सूचना

Electric Shock: शेतात काम करताना विजेच्या धक्क्याने ६० वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Education News : महाविद्यालय तपासणीला मनुष्यबळाअभावी ‘खो’, पालकांनी तक्रारी केल्यास कारवाई; शिक्षण विभागाचा पवित्रा

PMRDA News : पीएमआरडीए रिंगरोडसाठी भूसंपादन प्रक्रियेचा आढावा, आयुक्तांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

Bacchu Kadu: सातबारा कोरा करण्याचा शब्द नाही पाळला; बच्चू कडू, जलविद्युत प्रकल्पाविरोधातील गावागावांतील शेतकऱ्यांच्या घेतल्या भेटी

SCROLL FOR NEXT