five persons crime case registered against in kurundwad 
कोल्हापूर

अधिकाऱ्यालाच बंधाऱ्याच्या पिलरला दोरीने घातले बांधून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनिल केरीपाळे

कुरुंदवाड (कोल्हापूर) :तेरवाड ता.शिरोळ बंधाऱ्यावर पंचगंगा नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने व मृत माशांचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या  अधिकाऱ्याला दोरीने बांधून घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केलेप्रकरणी विश्वास बालीघाटे (रा. शिरढोण, ता.शिरोळ)बंडू पाटील (रा.हेरवाड,ता.शिरोळ)व अज्ञात तीन अशा पाच जणांविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन जनार्दन हरबड यांनी दिली आहे.


 पंचगंगा नदीपात्रात प्रदूषित पाणी आले आहे.मासे मृत झालेबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे.बंधाऱ्यावर पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी संकलित करा असा आदेश प्रदूषण मंडळाचे संजय मोरे यांनी क्षेत्रीय अधिकारी हरबड यांना दिला होता.

बुधवारी दुपारी तीन वाजता हरबड यांनी बंधाऱ्या जवळील पाण्याचे नमुने घेऊन मृत माशांचा पंचनामा करून जात असताना विश्वास बलिघाटे,बंडू पाटील व अज्ञात तीन अशा पाच जणांनी क्षेत्रीय अधिकारी हरबड यांना बंधाऱ्याच्या पिलरला बांधून घालून पाणी प्रदूषित करणाऱ्या घटकावर कारवाई केल्या शिवाय सोडणार नाही अशी भूमिका घेतल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना बांधून घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केले प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT