five thousand cross for corona patient in kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग ; कोल्हापुरात कोरोनाने ओलांडला पाच हजारचा टप्पा; आज तब्बल एवढ्या जणांना लागण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यातील सायंकाळपर्यंत २१३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या पाच हजार २८८ झाली आहे. दिवसभरात ३५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. अशांची संख्या आता दोन हजार १२७  झाली आहे. एकूण दोन हजार ८४१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

आज पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोरोना सेवेत असलेल्या एका वरिष्ठ शासकीय डाॅक्टरसह त्यांचा एक सहकारीही पाॅझिटिव्ह आले आहेत. कोरोना रूग्णांवर उपचार करणारेच दोघेजण पाॅझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, आज दिवसभरात आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता १५० वर पोहोचली आहे. 

वाढत्या रूग्णांमुळे बेडची संख्या अपुरी 

पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढत आहे. ‘सीपीआर’मध्ये बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. तरीही गंभीर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना येथे उपचारांसाठी घेण्यात येत आहे. उर्वरित बाधितांना महापालिका, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, इचलकरंजी, गडहिंग्लज येथील शासकीय व कोल्हापुरातील अन्य तीन खासगी रुग्णालयांकडे पाठविले जात आहे. अनेक रुग्ण स्वतःहूनच खासगी रुग्णालयांकडे जात आहेत. उपचार घेणाऱ्यापैकी ३४ व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. 


 त्या व्यक्तींचे काय करायचे?
लॉकडाउन काळात पॉझिटिव्ह येणाऱ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. इचलकरंजी, कोल्हापूर शहर व करवीर तालुका येथील रुग्णसंख्या अधिक आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्ती मिळून आलेल्या नाहीत. त्यामुळे ज्या व्यक्ती बाधितांच्या संपर्कात आल्या; पण अद्याप तपासणीला गेलेल्या नाहीत किंवा त्यांना आपण बाधितांच्या संपर्कात आलो होतो, हेच माहिती नाही, अशा व्यक्तींचे काय, असा प्रश्‍न जिल्हा प्रशासनासमोर उभा आहे.  

 
दृष्टिक्षेपात
एकूण कोरोनाग्रस्त ---  ५ हजार २८८
एकूण कोरोनामुक्त---- २ हजार १२७  
मृत्यू ----------------- १५०
सध्या उपचार घेणारे  ----२ हजार ८४१ 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT