flagon buying one nife free the ad in social media in kolhapur various prices 
कोल्हापूर

जाहिरात चक्क सोशल मीडियावर ; तलवार खरेदीवर चाकू फ्री

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अठराशे ते अडीच हजारांना तलवार, त्यावर चाकू ‘फ्री’... अशी थेट सोशल मीडियावर जाहिरात करून शस्त्रांची विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पाहून पोलिसही चक्रावून गेले. शस्त्रांचे कनेक्‍शन राजस्थानपर्यंत पोचले आहे. ही शस्त्रे खरेदी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

हाणामाऱ्यांत तलवारी, गुप्ती, खंजीर, चाकू अशा शस्त्रांचा सहज वापर आता नवा नाही. शहरासह जिल्ह्यात काही वर्षांपासून हे प्रमाण कमी झाले आहे. तरीही पोलिस यंत्रणेचा बेकादेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर व विक्री करण्यावर वॉच असतो. याच अनुषंगाने अंबाई टॅंक परिसरात दोन दिवसांपूर्वी जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी सध्या लक्षतीर्थ वसाहत येथे राहणाऱ्या संशयित किशोर मेस्त्री याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून चार तलवारी जप्त केल्या. 

संशयित किशोरकडून धक्कादायक माहिती पुढे आली. तो मूळचा वेंगुर्ला तालुक्‍यातील आहे. तीन दिवसांपूर्वीच त्याने लक्षतीर्थ वसाहतीत कपड्याचे दुकान सुरू केले. त्याने सोशल मीडियावर अठराशे, दोन हजार व अडीच हजारला तलवारी उपलब्ध असून खरेदीवर चाकू, खंजीरही भेट मिळेल, अशी जाहिरात सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन शस्त्राची विक्री तो करत होता अशी माहिती पुढे आली.

आतापर्यंत कपडे, बूट, टीव्ही, फ्रीज, दागिन्यांसह गृहउपयोगी वस्तूंची सोशल मीडियावर जाहिरात देऊन विक्री-खरेदी समजू शकतो; मात्र थेट शस्त्राच्या विक्रीबाबतची पोस्ट टाकून त्यावर सवलत देणारी जाहिरात टाकून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न नवा ठरला. ही शस्त्रे राजस्थानातून आणून विक्री केल्याचे पुढे आले. ही शस्त्रे कोणाच्या मदतीने आणली? कोणाकोणाला विकली? खरेदी करणारे कोण? ते कशासाठी वापर करणार होते? अशा अंगांनी तपास सुरू आहे.

"व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून जाहिराती आधारे शस्त्रांची विक्री प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल." 

- प्रमोद जाधव, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT