कोल्हापूर

कोल्हापूर - पुरामुळे शहरात पाणीटंचाई; वॉटर ATM समोर नागरिकांची गर्दी

महानगर पालिकेने टँकरने पाणीपुरवठाही सुरु केला आहे.

सुयोग घाटगे

कोल्हापूर : शहरातील पुरस्थितीमुळे (kolhapur city) निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे पिण्यासाठीच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी शहरात आणि उपनगरमध्ये अनेक ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वॉटर एटीएमवर (water ATM) नागरिकांनी गर्दी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे (heavy rain) नदीवरील पाणी उपसा केंद्र पुराच्या पाण्यामध्ये गेली आहेत. परिणामी शहरातील व उपनगरातील पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. (kolhapur flood live)

महानगर पालिकेने टँकरने पाणीपुरवठाही सुरु केला आहे. असे असले तरीही शुद्ध पेय जलसाठी जागोजागी असणाऱ्या वॉटर एटीएम समोर नागरिक गर्दी करू लागले आहेत. १ रुपये प्रति लिटर याप्रमाणे हे पाणी विक्री केली जात आहे. या सेंटर समोर नागरिक वॉटर कॅन घेऊन थांबले आहेत. काहींनी कॅन रांगेमध्ये ठेऊन आपला नंबर येण्याची वाट बघत असल्याचे चित्र आहे.

सकाळ पासून पावसाने उघडीप दिली असल्यामुळे नागरिक बाहेर पडले आहेत. या मुळे वॉटर सेंटरवर अधिक गर्दी दिसत आहे. नागरिकांच्या सततच्या वाढत्या मागणीमुळे काही वॉटर एटीएम सेंटरवरील पाणी संपले आहे. शुद्धीकरण करून पुन्हा सेंटर सुरु होण्यासाठी किमान ३ तासांचा अवधी लागत असल्यामुळे नागरिक दुसऱ्या सेंटरकडे धावत आहेत. पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर खर्चाच्या पाण्यासाठी तसेच काही जण पिण्याच्या पाण्यासाठी करत आहेत. मात्र पाऊस देखील थांबल्यामुळे या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT