foldable and adjustable helmet made by asnaket in sangli balkawade 
कोल्हापूर

बॅगमध्ये सहज बसणारे फोल्डेबल आणि ऍडजेस्टेबल हेल्मेट ; बलवडीच्या संकेतचा अनोखा प्रयोग

दीपक पवार

आळसंद : बलवडी भा. (ता. खानापूर) संकेत सदाशिव कुंभार याने मोटारसायकल स्वारांसाठी फुल फेस फोल्डेबल व ऍडजेस्टेबल हेल्मेट बनवले आहे. संकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, (लोणेरे) येथे तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकीत शिकत आहे. 15 व 16 डिसेंबर रोजी झालेल्या ऑनलाइन अन्वेषण या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत त्याने बेसिक सायन्स विभागातून देशात प्रथम क्रमांक मिळवला. 

बाजारात उपलब्ध हेल्मेटच्या समस्या लक्षात घेता त्याच्या असे लक्षात आले, की बरेच लोक हेल्मेट वापरणे टाळतात. त्यांना अपघातांना सामोरे जावे लागते. पोलिसांच्या कारवाईलाही सामोरे जावे लागते. बाजारात उपलब्ध पारंपरिक हेल्मेट आकाराने मोठे असल्याने हाताळणे त्रासदायक होते. पारंपारिक हेल्मेट विशिष्ट आकारातच उपलब्ध असते. हेल्मेट निवडताना अनेकांचा गोंधळ उडतो.

हेल्मेट विकत घेतल्यानंतर काही काळानंतर सैल पडू लागते. या समस्यांवर उपाय म्हणून संकेतने फोल्डेबल व ऍडजेस्टेबल हेल्मेट तयार केले. हेल्मेट अर्ध्या आकारात फोल्ड होते. बॅग किंवा दुचाकीच्या डिक्कीत सहज घेऊन बसू शकते. हेल्मेट दुचाकी वर सुद्धा अडकवण्याची, लॉक करण्याची सुविधा आहे. विशिष्ट रचनेमुळे हे हेल्मेट डोक्‍याच्या आकारानुसार ऍडजेस्ट करू शकतो. वापरकर्ते या हेल्मेटला ओपन फेस मोडमध्ये सुद्धा वापरू शकतात. 

महत्त्वाचे म्हणजे या हेल्मेटमध्ये दुचाकीस्वाराची सुरक्षितता, आरामदायी वापर यावर भर देण्यात आला आहे. नवीन संशोधनाने विद्यापीठ पातळीवर प्रथम येत संकेतने 2020 मध्ये अविष्कार राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत बेस्ट इनोवेशन इन महाराष्ट्र पुरस्कार मिळवला. 20 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे अन्वेषण संशोधन स्पर्धेत त्याची पश्‍चिम विभागातून देशपातळीवर निवड झाली.

स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. 15 व 16 डिसेंबर रोजी राजीव गांधी औद्योगिकी विश्वविद्यालय, भोपाळ येथे एआययुतर्फे झालेल्या अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत त्याने बेसिक सायन्स विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला. रोह्यासारख्या ठिकाणी राहत, त्याने संशोधन करून यश मिळवल्याने त्याचे कौतुक होत आहे. त्याला आई-वडील, प्राध्यापक आणि मित्रांनी सहकार्य केले. या हेल्मेटचे पेटंट त्याने फाईल केले आहे. 

"येत्या काळात हे फोल्डेबल व ऍडजेस्टेबल हेल्मेट बाजारात लवकरच उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दुचाकी धारकांसाठी ते फायदेशीर ठरेल."

- संकेत कुंभार 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT