follow the conditions, but let the class start ... 
कोल्हापूर

सोशल डिस्टन्स, अटी पाळू, पण क्‍लास सुरू करू द्या... 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : खासगी क्‍लास चालकांचा चरितार्थ पूर्णपणे क्‍लासवरच अवलंबून आहे. 10 वीच्या विद्यार्थ्यांचे पालकही क्‍लास कधी सुरू होणार, याची विचारणा करत आहेत. त्यामुळे खासगी क्‍लासला परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्‍लासेस टीचर्स असोसिएशन (केप्टा) यांनी केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली आहे. 

मार्चमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा बंद झाल्या. तसेच क्‍लासही बंद केले. सीईटी आणि नीट परीक्षेचे क्‍लास घेणाऱ्यांनी आपला अभ्यासक्रम, उजळणी ऑनलाईन वर्ग घेऊन पूर्ण केले. लॉकडाउन असल्याने 10 वीचे उन्हाळी वर्गही घेता आले नाहीत. जुलैपर्यंत क्‍लास घेता येणार नसल्याने क्‍लासचालकांची अडचण झाली आहे. तीन महिन्यांपासून क्‍लास बंद असल्याने क्‍लासचालकांची आर्थिक अडचणही झाली नाही.

बहुतांशी क्‍लास चालकांची जागा भाड्याची आहे. त्यामुळे त्यांना भाडेही भरावे लागणार आहे. वीज बिलही त्यांनाच भरावे लागणार आहे. त्यामुळे 10 वीचे क्‍लास सुरू करा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून आणि खबरदारी घेऊन आम्हाला क्‍लास सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी क्‍लासचालकांनी केली आहे. 

तीन महिन्यांपासून क्‍लास बंद असल्याने क्‍लासमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून क्‍लास घेण्यास परवानगी द्यावी. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियम पाळून व खबरदारी घेण्याची तयारी क्‍लासचालकांची आहे. 
- प्रा. सुभाष देसाई, अध्यक्ष, प्रायव्हेट क्‍लासेस टीचर्स असोसिएशन 

दृष्टिक्षेपात 
- जिल्ह्यातील क्‍लास चालक - 1000 
- शिक्षक - 10,000 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : कोल्हापुरात बेल्टने मारहाण करत 20 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीती घालून दोन वर्षांपासून ठेवले शारीरिक संबंध

Chhatrapati Sambhajinagar: व्यावसायिकाला डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले; जेवणाची ऑर्डर देण्यासाठी बोलावले;दागिन्यासह रोख रक्कम पळविली

Latest Marathi News Live Update : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता

Sangola Accident: घराच्या थोड्याच अंतरावर काळाचा घाला! टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य ठार; सांगोला-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात..

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

SCROLL FOR NEXT