football player Diego Armando Maradona kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे स्मारक उभारणार

मतीन शेख

 कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे कोल्हापुरातल्या फुटबॉल क्षेत्रात निरुत्साह संचारला आहे. या शिथिलतेची जागा उत्साहाने घ्यावी व फुटबॉल खेळाने उभारी घ्यावी यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूट (साई) व फुटबॉल महासंग्राम यांच्यातर्फे कोल्हापुरात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे स्मारक, सॉकर थीम पार्क उभारने तसेच 8 ते 14 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी प्रोफेशनल ट्रेनिंग अॅकॅडमी सुरु करणार असल्याची माहिती सॉकर अमॅच्युअर इन्स्टिट्यूटचे सतिश सुर्यवंशी यांनी दिली.

ते म्हणाले, फुटबॉल प्रेमींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या मॅराडोनाच्या खेळाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी मॅराडोनाचे स्मारक कोल्हापूरात उभारण्यात येणार आहे. कोलकत्यानंतर कोल्हापूरातच असे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकडे आयलंडची मागणी केली गेली आहे. कोल्हापुरची भविष्यात 'सॉकर सिटी' म्हणून ओळख निर्माण होणार आहे. तसेच सॉकर थीम पार्कची उभारणी करुन विविध खेळाडूंचे शिल्प या बागेत ठेवली जाणार आहेत. तसेच या पार्क मधील संग्रहालय निर्मिती करुन फुटबॉल खेळाडूची चित्ररुपी मांडणी केलेली जाणार आहे.

8 ते 14 वर्षाखालील मुला मुलींना फुटबॉलचे तंत्रशुध्द प्रशिक्षण ॲकॅडमीची ऊभारणी केली जाणार आहे. देशातील तसेच कोल्हापुरातील प्रशिक्षक तसेच नामवंत खेळाडू या मुलांना प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी संताजी भोसले, प्रशांत पोवार, योगेश घोरपडे उपस्थित होते. 


संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT