Foreign workers on road in kolhapur 
कोल्हापूर

Video- कोल्हापुरात परप्रांतिय कामगारांचा उद्रेक, शेकडो कामगार रस्त्यावर

अभिजित कुलकर्णी

नागाव (कोल्हापूर) : जिल्ह्याच्या तिन्ही औद्योगिक वसाहतींमधील परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्याच्या ओढीने शिरोली येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर जमले आहेत. काल बिहारला जाणाऱ्या चारशे मजुरांना येथूनच एसटी बसमध्ये बसून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू टर्मिनसवर सोडण्यात आले होते. त्यामुळे आज उत्तर प्रदेशसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने उत्तर प्रदेश मधील शेकडो परप्रांतीय मजुरांनी क्रीडांगणावर गर्दी केली होती. यामध्ये कागल, गोकुळ शिरगाव व शिरोली अशा तीनही औद्योगिक वसाहतींमधील उत्तर प्रदेशच्या मजुरांचा समावेश होता. 

सकाळी आठ वाजल्यापासून येथे गर्दी झाली होती. या गर्दीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन या मजुरांना समजविण्याचा प्रयत्न केला व त्यांना आपापल्या राहत्या ठिकाणी परत जाण्याची विनंती केली. पोलिसांच्या या विनंतीला मान देऊन काही परप्रांतीय पुन्हा आपल्या खोलीवरती परत गेले. मात्र काही परप्रांतीयांनी आपण घरमालकाचे सगळे भाडे देऊन खोली सोडून बाहेर पडल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्याला आता रस्त्यावर किंवा स्टेशनवर राहिल्या शिवाय पर्याय नाही. अन्यथा आम्ही चालत उत्तर प्रदेशला जाऊ असे त्यांनी सांगितले. त्यामुळे काही मजूर चालत पुण्याच्या दिशेने गेले. तर काही मजूर चालत कोल्हापूर रेल्वे स्टेशनकडे गेले. त्यांच्यासोबत महिला व मुलेही होते. त्याशिवाय सर्व बिस्तारा आपल्या डोक्यावर घेऊन ते रस्त्याने चालत निघाले होते. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, पोलिसांनी शिरोली येथे या कामगारांना रोखले असून पोलिस आणि कामगारांमध्ये वादावादी झाल्याले तणावाचे वातावरण निर्मान झाले आहे. पालकमंत्री सतेज वाटील यांनीही या कामगारांची व्यवस्था केली जाईल असे सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT