Forest Fires For Hunting In Chandgad Taluka Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

शिकार पकडण्यासाठी जंगलाला आगी

अशोक पाटील

कोवाड : कागणी व कल्याणपूर परिसरात जंगली प्राण्यांच्या शिकारीचे प्रस्थ वाढले आहे. जाळे आणि फास लावून शिकार करण्याची पध्दत विशेष चर्चेत आली आहे. शिकारीचा हा धोकादायक प्रकार शेतकऱ्यांच्या मुळावर आला आहे. शिकार पकडण्यासाठी जंगलाला आगी लावण्याचे प्रकार होत आहेत. त्यातून गवताच्या गंजी व आंबा,काजूच्या बागांची राखरांगोळी होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. शिकार मिळण्याचे हे हमखास ठिकण असल्याने शिकार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वनविभागाने याची दखल घेतली नाही तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन उभे करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

वनविभाग शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कागणी येथील बाबासाहेब देसाई या शेतकऱ्यांने केला आहे. शिकारीसाठी जंगलाला आगी लावण्याचे प्रकार वाढले आहेत. यातून शेतकऱ्यांचे गवत व गवताच्या गंज्या तसेच आंबा व काजूच्या झांडांचे नुकसान होत आहे. शिकारी शिकारीसाठी हे प्रकार करत असले तरी एकमेकांच्या झाडांना आगी लावल्याचा संशयावरून वादाचे प्रसंग घडत आहेत. कल्याणपूर व कागणी परिसरात गवताळ जमीन आहे. 

रात्रीच्यावेळी जाळे लावले जाते, तर दिवसा गवताना आगी लावून तारेचे फास आवळले जातात. गेल्या दोन वर्षात येथील शेतकऱ्यांनी शिकार करताना अनेकांना पकडले होते, पण जुजबी कारवाईवर त्यांना सोडून दिले. शिकार करणाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी महसूल विभाग व वनविभागाकडेही दाद मागितल्याचे देसाई यांनी सांगितले, पण दखल घेतलेली नाही. याबाबत तात्काळ कार्यवाही झाली नाही, तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 

जैवविविधतेला धोका 
एका बाजूला आग लावली जाते व दुसऱ्या बाजूला जाळे लावून शिकार केली जाते. यामुळे आगीत जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्यांसह जैवविविधतेला धोका पोहोचत आहे. 

भरपाई नाहीच 
शिकारीच्या निमित्ताने आजपर्यंत येथील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे आहे. जळीत क्षेत्राचे पंचनामे झाले, पण नुकसान भरपाई मात्र मिळालेली नाही. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Solapur Accident : तुळजापुरला जाताना काळाचा घाला, कोल्हापूर–सोलापूर रस्त्यावर भीषण अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य ठार

फक्त 10,999 मध्ये खरेदी करा 50MP सेल्फी कॅमेरा; AI फीचर्स, iPhone सारखा जबरदस्त मोबाईल, 31 मार्चपर्यंत 14 हजारचा डिस्काउंट

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांनी भोंदू बाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Crime : चॉपर हल्ल्यातील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू; 500 रुपये न दिल्याने पोटात केले होते वार, दहा तास मृत्यूशी झुंज अयशस्वी

LPG Gas : गॅस तुटवड्यात काळाबाजार तेजीत; कोल्हापुरात घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर उघड

SCROLL FOR NEXT