Former Minister of State for Agriculture Sadabhau Khot corona positive 
कोल्हापूर

माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) : माजी कृषी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते इस्लामपूर येथील राहत्या घरी क्वारंटाईन होऊन उपचार घेत आहेत.  त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. याबाबत त्यांनी स्वतः फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. आमदार खोत यांनी फेसबुकवर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 'माझी कोव्हिड 19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र मी आता ठीक आहे. 

मी क्वारंटाईन झालो आहे. तरी आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गणरायाच्या व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन. खोत कोरोना संसर्गाच्या काळातही सक्रिय होते. सांगली येथे रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झालेल्या इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरु झालेल्या कोव्हिड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देखील उपस्थित होते. दरम्यान संर्पकात आलेल्या लोकांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी तपापणी करुन घ्यावी असे अवाहन केले आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT