Former MP Raju Shetti esakal
कोल्हापूर

'शेतकऱ्यांना गत हंगामातील 200 रुपये द्या, अन्यथा आमच्या हातात उसाचा बुडखा आहेच'; कारखानदारांना शेट्टींचा सज्जड दम

Former MP Raju Shetti : कारखाने १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू करता येणार नाहीत; पण जे करतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे प्रतिटन ५०० रुपये दंड आकारावा.

सकाळ डिजिटल टीम

‘‘राज्यात दोनशे ते अडीचशे घराणी राजकारण करतात. त्यांच्यातील व्यक्तीच आलटून- पालटून विविध पक्षातून निवडून येतात.''

कोल्हापूर : गत हंगामातील गाळप उसापासून झालेल्या उपउत्पादनांची विक्री जादा दराने झाली. त्याचे अतिरिक्त दोनशे रुपये शेतकऱ्यांना यंदाच्या ‘एफआरपी’बरोबर मिळाले पाहिजेत. सरकारने कारखानदारांना याबाबत आदेश द्यावेत; अन्यथा आमच्या हातात उसाचा बुडखा आहेच, असा सज्जड इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी साखर कारखानदारांना (Sugar Factory) दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या शेट्टी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

शेट्टी म्हणाले, ‘‘आमची ऊस परिषद (Sugarcane Council) २५ ऑक्टोबरला आहे. त्या आधी आम्ही गेल्या वर्षीच्या अतिरिक्त दोनशे रुपयांची मागणी केली आहे. कारण गेल्या हंगामातील साखरेसह, बगॅस, मोलॅसिस, इथेनॉल, स्पिरीट यांची जादा दराने विक्री झाली आहे. त्यामुळे यंदाच्या एफआरपीबरोबरच गेल्या हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये अतिरिक्त मिळावेत, अशी मागणी आम्ही महिनाभर आधी केली आहे. त्यामुळे कारखानदारांनी याबद्दल त्वरित विचार करावा.

कारखाने १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू करता येणार नाहीत; पण जे करतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे प्रतिटन ५०० रुपये दंड आकारावा. कारखानदार सरकारपेक्षा मोठे झालेत का? सरकारने कारवाई करावी; अन्यथा आमच्या हातात उसाचे बुडखे आहेच. बारा टक्के उतारा असणारा माळेगाव कारखाना ३६०० दर देतो. अकरा टक्के रिकव्हरी असणारा विठ्ठल कारखाना ३५०० रुपये पहिली उचल जाहीर करतो; मग आपल्या येथील १३ टक्के उतारा असणाऱ्या कारखान्यांना दर देण्यास काय झाले?’’

परिवर्तन महाशक्ती आघाडीबाबत शेट्टी म्हणाले, ‘‘राज्यात दोनशे ते अडीचशे घराणी राजकारण करतात. त्यांच्यातील व्यक्तीच आलटून- पालटून विविध पक्षातून निवडून येतात. या सर्वांना बाजूला करून स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना लोकप्रतिनिधी करणे, हाच आमच्या आघाडीचा उद्देश आहे. यामुळेच आम्ही ३० ते ३५ संघटनांना घेऊन एकत्र आलो आहोत. राज्यातून विविध ठिकाणांहून आम्हाला उमेदवारीसाठी संपर्क साधला जात आहे; मात्र इच्छुकांची तपासणी करूनच आम्ही उमेदवारी देणार आहोत. जागा वाटपाबद्दल आमच्यात कोणतीच मतभिन्नता नाही.’’

शरद पवार आतून भाजपचेच

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत.त्याबाबत शेट्टी म्हणाले, ‘‘भाजपमध्ये गेल्यावर शांत झोप लागते, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. शरद पवार यांनी त्यांना सांगितले असेल की मी आतून भाजपचाच आहे. माझ्या पक्षात या इथेही शांत झोप लागेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT