Former Secretary to the Governor V. B. Kulkarni passed away 
कोल्हापूर

राज्यपालांचे माजी सचिव व्ही. बी. कुलकर्णी यांचे निधन...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - पन्हाळा येथील वसंतराव भिकाजी कुलकर्णी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. शासकीय सेवेमध्ये 35 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावताना मंत्रालय व राज्य भवन येथे विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या व आपल्या कामाचा ठसा उमटवला. शरद पवार ते आर. आर. पाटील तसेच इतर अनेक मंत्र्यांच्याकडे खाजगी सचिव म्हणून काम केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत ग्रामविकास उपसचिव म्हणून काम करीत असताना भरीव योगदान दिले. त्यानंतर महाराष्ट्राच्या महामहीम राज्यपालांचे खाजगी सचिव म्हणून 5 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले.

सेवानिवृत्तीनंतर पन्हाळा मुक्कामी राहून ज्योतिषशास्त्र व फेंगशुईचा अभ्यास करून अनेकांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांची विविध विषयातील अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपल्या सेवा अनुभवाचा सामान्य लोकांसाठी त्यांच्या शासकीय स्तरावरील कामांमध्ये पुरेपूर उपयोग करून दिला.

त्यांच्या पश्चात पत्नी प्रभा, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा मोठा उच्चशिक्षित परिवार आहे. मुलगा मिलिंद हा परदेशी मुक्कामी असल्याने कन्या डॉ. मेघा यांनी पार्थिवास मैत्रोग्नी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

Kankavli Assault Case: गणपतीला माहेरी आली, जमिनीच्या वादातून आई-भावंडांसह पाच जणांकडून बेदम मारहाण

सासूसोबत जिनिलीयाचं खास बॉण्डिंग, घरच्या गणपतीची लगबग; देशमुख कुटुंबाचे फोटो व्हायरल

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

IND vs AFG, T20I: मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज! सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष, पाचव्या गोलंदाजाची चिंता कायम; कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT