कोल्हापूर

संसर्ग रोखण्याचा वाहतूक शाखेचा फॉर्म्युला जिल्ह्यात चर्चेत

राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: पहिल्यांदा अँटिजेन टेस्ट,(Antigen test)ची लक्षणे अढळली तर थेट कोविड सेंटरमध्ये (covid center)जावे लागणार या धास्तीने जप्त वाहने ताब्यात घेण्यासाठी होणाऱ्या गर्दीला चांगलाच ब्रेक लागला आहे. संसर्ग रोखण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा हा फॉर्म्युला शहरासह जिल्ह्यात चर्चेचा बनला आहे. (formula-of-the-city-traffic-control-branch-break-to-seize-confiscated-vehicles-news)

कोरोनाचे संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाची लढाई सुरू आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव रोण्यासाठी कडक लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी जिल्हा पोलिस दल गेल्या दीड महिन्यापासून अव्याहतपणे रस्त्यावर बंदोबस्त बजावत आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरू नका असे वारंवार आवाहान करूनही त्यांची संख्या कमी होत नाही. अशांवर कारवाईचा बगडा उगारण्यास पोलिसांनी सुरवात केली.

विनाकारण फिरणाऱ्यांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्त करण्याचीही कारवाई पोलिसांनी सुरू केली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेनेही शहर परिसरात धडक कारवाई केली. त्यात सुमारे तीनशेहून अधिक वाहने जप्त केली. ही वाहने सात दिवसानंतर चालकांच्या ताब्यात देण्यात येतात. कडक लॉकडाऊन काळात जप्त वाहनांची संख्या वाढली होती. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर ही वाहने ताब्यात घेण्यासाठी शहर वाहतूक शाखेबाहेर चालकांची मोठी गर्दी झाली होती. यातून संसर्गाचे धोके वाढण्याची भिती निर्माण झाली होती. यावर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने अँटिजेन टेस्टचा उपाय काढला.

हेही वाचा- जयसिंगपूरच्या शिवार कोविड सेंटर मध्ये रंगली गाण्याची मैफल;संगीतमय मैफलीत विसरले कोविडचे दुखणे

जप्त केलेली वाहने ताब्यात घेण्यासाठी वाहन मालकांची पहिल्यांदा कार्यालयाबाहेरच अँटिजेन टेस्ट घेण्यास सुरवात केली. त्यात जर संसर्गाची लक्षणे दिसली की संबधिताला थेट कोविड सेंटरला पाठविण्याचे नियोजन केले. त्यामध्ये एकाच्या टेस्टमध्ये लक्षणे दिसून आली. तसे त्यांना थेट कोविड सेंटरमध्ये पाठविण्यातही आले. संसर्ग रोखण्यासाठी वाहतूक शाखेने केलेले अँटिजेन टेस्टचे नियोजन पाहून जप्त वाहने परत नेण्याकडे वाहन मालकांनी पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गर्दी टाळून संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक शाखेकडून केलेल्या या उपाययोजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दृष्टीक्षेपात...

मोटार वाहन ॲक्टनुसार - ८२ हजार ८९३ जणांवर कारवाई

दंड वसूल - १ कोटी ४५ लाख ६१ हजार ८००

जिल्‍यातील जप्त वाहने - ७ हजार ३६३

शहर वाहतूक शाखेकडील जप्त वाहने - २५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात आज जोरदार पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट जारी; तुमच्या भागात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Maratha Reservation: समाजापासून मला दूर ठेवण्याचा सरकारचा कट; माढ्यातील इशारा सभेत मनोज जरांगे यांचा आरोप, आरक्षणाचा लढा सुरूच राहणार

अर्थभान : इमर्जिंग अर्थव्यवस्थांमध्ये भारत अव्वल

शाळांना यंदा ११ दिवस दिवाळी सुट्टी! शैक्षणिक वर्षात २३७ दिवस अध्यापनाचे अन्‌ शिक्षकांना १२८ दिवस सुट्ट्या; यंदा वार्षिक परीक्षा एप्रिलअखेर, वाचा...

Jharkhand Protest: झारखंडमध्ये भरती परीक्षांवरून आंदोलन पेटले; विद्यार्थी संघटना सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम

SCROLL FOR NEXT