Forty days later the shutters of the bullion shops opened 
कोल्हापूर

चाळीस दिवसांनी सराफ दुकानांचे शटर उघडले 

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर : सराफ दुकाने आज सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत सम-विषम तारखेनुसार सुरू झाली आहेत. पहिल्याच दिवशी सम तारखेतील निम्मी दुकाने आज सुरू झाली. यातूनच दिवसांत पन्नास लाखांहून अधिक सोन्याच्या दागिन्यांची उलाढाल झाली. सम आणि विषम तारखे मुळे आज सराफ पेढ्यांवर निम्मीच दुकाने उघडण्यात आली होती. उद्या विषम तारखेला निम्मी दुकाने उघडली जाणार आहेत. 

तब्बल चाळीस दिवसांच्या लॉक डाऊननंतर सराफ दुकाने उघडायची की नाही ही संभ्रमावस्था काल व्यापारी-उद्योजकांच्या बैठकीत संपली. तेथे झालेल्या सम-विषम तारखेच्या निर्णयानंतर आज सकाळी दहा वाजता सराफ दुकाने उघडल्यामुळे कामगारांत समाधानाचे वातावरण होते. आज सम तारखेला भाऊसिंगजी रोड, गुजरी, परीट गल्ली, कासार गल्ली, भेंडे गल्ली, महादेव गल्ली, घाटी दरवाजा येथील दुकाने सुरू करण्यात आली. तसेच विषम तारखेला पश्‍चिम आणि उत्तर बाजूची दुकाने सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितले. 

मे महिन्यात लग्न सराई असल्यामुळे एप्रिल, मे मध्ये सराफ दुकानांत मोठ्या प्रमाणात उलाढाल होणे अपेक्षीत होते. तसेच गुढीपाडवा, अक्षय तृतीयाचे हे मुहुर्तही टळले आहेत. त्यामुळे आज दुकाने उघडल्यानंतर काही छोट्या मोठ्या समारंभाची खरेदी आज झाली. तसेच कारागिरांच्या हातालाही काम मिळाले. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून आम्ही दुकाने सुरू केली आहेत. दुकाने सुरू झाल्याची माहिती ग्राहकांपर्यंत पोचल्यानंतर गर्दी वाढेल, असे संचालक तेजस धडाम यांनी सांगितले. 
 

कामगारांतून समाधान... 
गुजरी परिसरात सुमारे सोळाशे कामगार आहेत. त्यापैकी आज निम्या दुकानांतील कामगारांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. सराफ दुकाने सुरू झाली असली तरीही म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. सराफ दुकानांत उद्यापासून (7) पुन्हा गर्दी होईल, असा अंदाज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

Gangapur News : १ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी आणि जामिनाच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; चिमुकलीचा ताबा घेत विवाहितेला घरातून हाकलले

Ausa News : ओमराजेंबाबत आदित्य ठाकरेंचा ‘सॉफ्ट कॉर्नर’? बंडखोरी केलेल्या खासदारावर थेट बोलणे टाळले; ‘यायला हवे होते’ एवढेच उत्तर

SCROLL FOR NEXT