Foundry needs skilled manpower 
कोल्हापूर

येथे आहेत तरूणांसाठी रोजगाराच्या संधी! फाउंड्रीसाठी हवे कुशल मनुष्यबळ

अभिजित कुलकर्णी

नागाव : कोल्हापूर फाउंड्री क्‍लस्टर आणि इंडो जर्मन प्रोग्रॅम फॉर व्होकेशनल एज्युकेशन ॲण्ड ट्रेनिंगच्या माध्यमातून फाउंड्री उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी विशेष अभ्यासक्रम सुरू होत आहेत. यामुळे फाउंड्री उद्योगातील कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून निघेल, अशी अपेक्षा आहे.

केंद्र शासनाने सर्व जिल्ह्यांत विखुरलेल्या सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाला संघटित करून प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे पंधरा वर्षांपूर्वी क्‍लस्टर योजना सुरू केली. यामुळे कोल्हापूर फाउंड्री क्‍लस्टरच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिरोली, गोकुळ शिरगाव, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, एल. के. आकिवाटे, छत्रपती शाहू इंडस्ट्रियल इस्टेट आदी औद्योगिक क्षेत्रांना निधी उपलब्ध झाला. याच धर्तीवर स्किल इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्यात कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. 

फाउंड्री उद्योगामध्ये मोल्डर, भट्टी ऑपरेटर, सॅण्ड टेस्टिंग लॅब ऑपरेटर आणि फेटलिंग ऑपरेटर यांची प्रचंड कमतरता आहे. हे ओळखून शिरोली मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन (स्मॅक) आयटीआयच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेत विशेष वर्ग सुरू करत आहे. ॲप्रेंटिसशिपवर चालणाऱ्या अभ्यासक्रमासाठी फाऊंड्री उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःकडील कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम हा कोर्स दिल्यास कामाची गुणवत्ता अधिक चांगली होईल. शिवाय या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या अन्य युवकांना प्रोत्साहन व रोजगार मिळेल. ॲप्रेंटिसशिपवर हा अभ्यासक्रम असल्यामुळे थिअरी स्मॅक आयटीआयमध्ये व प्रॅक्‍टिकल थेट फाउंड्री उद्योगात होणार आहे.


  जिल्ह्यात एकूण फाउंड्री 
    जवळपास १५०
  कर्मचाऱ्यांची संख्या २० हजारांवर
  महिन्याकाठी एकूण 
    उलाढाल ७० कोटी

केंद्र शासनाच्या स्किल इंडिया योजनेतून क्‍लस्टर योजनेशी संबंधित असोसिएशन याचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्या गरजेनुसार ते स्किल डेव्हलप करू शकतात.
- सचिन पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर फाउंड्री क्‍लस्टर

दृष्टिक्षेपात फाउंड्री
  जिल्ह्यात एकूण फाउंड्री 
    जवळपास १५०
  कर्मचाऱ्यांची संख्या २० हजारांवर
  महिन्याकाठी एकूण 
    उलाढाल ७० कोटी

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT