four arrested in hotel vandalism in kolhapur ichalkaranji 
कोल्हापूर

थंड चहानं डोकं केलं गरम; मग झाला एकच राडा 

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी (कोल्हापूर) - थंड चहा दिल्याच्या रागातून चाकू हल्ला करून हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केल्या प्रकरणी पाच जणांवर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. सलमान नदाफ, नागेश पुजारी, सौरभ ढाले, संकेत नाकर्डे, गौरव कारंडे (सर्व रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. यातील कारंडे वगळता अन्य संशयितांना अटक केली. 

याबाबतची तक्रार महम्मद वसीम इकबाल कुरेशी (वय 32, नदीवेस) यांनी दिली आहे. त्याचे नदीवेस नाका परिसरात हॉटेल नूर आहे. सर्व संशयित गुरुवारी सांयकाळी त्याच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आले होते.

थंड चहा दिल्याच्या कारणातून वाद घातला. यातून पुजारी याने कमरेला असलेला चाकू काढून कुरेशीच्या कमरेजवळ दोन ठिकाणी भोसकला. अन्य संशयितांनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून हॉटेलमधील साहित्याची मोडतोड केली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंद केला असून कारंडे वगळता चौघांना अटक केली आहे. पोलिस पुढिल तपास करत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack Mumbai : मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत शिरला बिबट्या, पाळीव कुत्र्यावर केला हल्ला; सीसीटीव्हीत कैद थरारक घटना

कार्यकर्त्यांचे ऐकून सर्व प्रयोग झाले, कुठेच 'स्कोप' नाही, आता भाजपमध्ये आलो; समरजीत घाटगेंची घरवापसी

Iran-US ceasefire : पैसाच पैसा! होर्मुझमधून करणार कमाई, युद्धविरामानंतर ट्रम्प यांचं विधान; इराणचा भडका उडणार

Ganeshmurti : गणेशमूर्तींनाही युद्धाचा फटका; अमेरिकावारीसाठी सज्ज गणेशमूर्ती अडकल्या

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

SCROLL FOR NEXT