four gates are available for CPR hospital but only one gate use for public and because many problems faces all in kolhapur
four gates are available for CPR hospital but only one gate use for public and because many problems faces all in kolhapur 
कोल्हापूर

Kolhapur CPR Fire : सीपीआरचे चारही प्रवेशद्वार उघडण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सीपीआरमध्ये सध्या एकाच प्रवेशद्वाराने ये-जा सुरू आहे. कोणतीही दुर्घटना घडली तर आतमध्ये आपत्ती निवारण यंत्रणा आणण्यात अनेक अडचणी आहेत. त्यासाठी सीपीआरला असणारी चारही प्रवेशद्वार उघडण्याची गरज आहे. अंतर्गत वाहतुकीचे मार्गही नीट केले पाहिजेत. पार्किंगची व्यवस्था नियोजनपूर्वक असली पाहीजे. सीपीआर व्यवस्थापनाचे दुर्लक्ष आहे. 

सीपीआरच्या इमारतीला चार प्रवेशद्वार आहेत. यातील एक प्रवेशद्वार न्यायालयाच्या जुन्या इमारतीसमोर आहे तर दुसरे करवीर तहसीलदार कार्यालयाला लागून आहे. तिसरे प्रवेशद्वार शाहू स्मारकच्या बाजूला आहे. चौथे प्रवेशद्वार लक्ष्मीपुरी पोलिस लाईनच्या बाजूला आहे. ही चारही प्रवेशद्वारे सुरू ठेऊन त्याचे नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे.

रुग्णवाहिका, शववाहिका, कैद्यांसाठीची वाहने यांना एक प्रवेशद्वार आरक्षित केले पाहिजे. त्यामुळे उर्वरित तीन प्रवेद्वारांवर वाहतुकीचा ताण येणार नाही. अंतर्गत पार्किंगदेखील अस्ताव्यस्त आहे. अग्निशमन दलाचा टॅंकर सर्वत्र पोहचू शकत नाही. त्यासाठी येथे पार्किंगचे नियोजन करणे गरचेचे आहे. इमारतींच्या लिफ्ट बंद असणे, दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या मार्गात अडथळे यामुळे भिषण प्रसंग आलाच तर रुग्णांना तेथून हलवणेही अवघड आहे.
 

मागील दरवाजा उघडा हवा 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला लक्ष्मीपुरी पोलिस लाईनच्या बाजूला एक प्रवेशद्वार आहे. सध्या हे प्रवेशद्वार बंद असून तेथे कोंडाळा ठेवला आहे. हा दरवाजा सुरू केल्यास आपत्‍कालीन परिस्थितीत या दरवाज्याचा उपयोग करून रुग्णांना बाहेर काढता येईल.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT