Four gates opened of kolhapur Radhanagari dam  
कोल्हापूर

ब्रेकिंग : राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले ;नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

राजू पाटील

राशिवडे बुद्रुक(कोल्हापू)- दोन दिवसांपासून कोल्हापूरला पावसाने झोडपून काढले आहे. राधानगरी तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे राधानगरी धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांपैकी चार दरवाजे आज पुन्हा खुले झाले आहेत. यातून व वीज गृहातून 7056 इतका विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे.  

दरम्यान, काळम्मावाडी धरण 95 टक्के भरले असून याचे वक्राकार दरवाजे उघडण्यात आले आहेत. यातून 5886 क्यूसेक व विजगृहातून 1800 असा 7686 क्यूसेकचा विसर्ग केल्याने दुधगंगासह भोगावतीच्या काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 तालुक्यातील तिन्ही धरणांचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले होते. परंतु, कालपासून वाढलेल्या पावसामुळे काल सकाळी दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने भोगावती नदी पात्रात 4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. आज सायंकाळपर्यंत आणखी दोन खुले झाले. तर काळम्मावाडी धरणातील आवक विचारात घेवून 5886 क्यूसेक विसर्ग आज सुरू केला आहे.

तुळशी धरण पाणलोट क्षेत्रातही आज पावसाने चांगला जोर धरला. याच्या वक्राकार दरवाजातूनही तुळशी नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. आज सकाळी आठपासून सायंकाळी चार पर्यंत 66 मिलीमिटर पाऊस राधानगरी धरणक्षेत्रावर झाला आहे.

संपादन- धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

GT vs RR Live : वैभव सूर्यवंशीची विक्रमी कामगिरी! यशस्वी जैस्वालसोबत मोडला सेहवाग-गंभीरचा विक्रम, रिषभ पंतवरही केली कुरघोडी

Pune News: शाळेतील फी वाढ अन्यायकारक! पुण्यात पालकांचं आंदोलन; मनसेच्या आंदोलकांनी केली पैशांची उधळण

SCROLL FOR NEXT