Four lakhs are gone and there is no debt
Four lakhs are gone and there is no debt 
कोल्हापूर

चार लाख गेले ते गेले आणि कर्जही नाही

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः कर्जाच्या आमिषाने केअर सेंटर संचालिकेला चार लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी दाम्पत्याविरोधात करवीर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. विजय ऊर्फ दत्तात्रय ज्ञानदेव पाटील व रेखा पाटील (दोघे रा. जयसिंगपूर) अशी त्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद अर्चना दगडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती, अर्चना दगडे वृद्धांसाठी केअर सेंटर चालवितात. सेंटरला जागा अपुरी पडत असल्याने त्यांना जागेची आवश्‍यकता होती. त्यांनी एक प्लॉट पाहिला होता. त्याच्या बांधकामासाठी त्यांना 30 ते 35 लाख कर्जाची गरज होती. त्यासाठी त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये विजय पाटील याच्याशी संपर्क साधला. पाटीलने त्यांना कर्जासाठी 20 टक्‍के अनामत रक्‍कम भरावी लागेल, असे सांगितले. 26 जून 2019 ला दगडे यांनी विजय व रेखा पाटील या दोघांनी दिलेल्या खात्यावर एक लाख रुपये, तर दुसऱ्या दिवशी तीन लाख रुपये जमा केले. यानंतर पाटील दाम्पत्याने कोल्हापुरात संबंधित प्लॉटचीही पाहणी केली. मात्र, कर्जाची रक्‍कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. आपली फसवणूक झाल्याची फिर्याद दगडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT