Four month-old baby corona free in kolhapur 
कोल्हापूर

चार महिन्याच्या चिमुकल्याने केली कोरोनावर मात 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर-  चार महिन्यांचे बाळ कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आणि पायाखालची वाळूच घसरली. उपचारासाठी कुठे जावे कळेना. अखेर व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये बाळासह घरातील सर्वच जण पॉझिटिव्ह समजून दाखल झाले आणि येथील यशस्वी उपचारांनंतर ही सारी मंडळी आज सुखरूप घरी परतली. 

अरविंद माने यांच्या घरात आई पॉझिटिव्ह आली. घरची परिस्थिती बेताचीच. अनेक दवाखाने फिरले. अखेर त्यांना व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये दाखल केले. घरातील चौघांचे स्वॅब तपासणीसाठी दिल्यावर चार महिन्यांच्या ओमचा अहवाल पॉझिटिव्ह, तर बाकी सर्वांचे निगेटिव्ह आले. 

आईला तर अश्रू अनावर झाले. कारण बाळाला सोडून एक सेकंदभरही राहायचा कधीच त्यांनी विचार केलेला नव्हता. अखेर व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्याशी संपर्क साधून सर्वजण येथे दाखल झाले. सर्वजण एकाच रूममध्ये राहिले. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी यांनी ऑनलाईन उपचाराचे सल्ले दिले आणि त्यानुसार १४ दिवसांत ओम ठणठणीत बरा झाला. डॉ. अमोल कोडोलीकर, हीना यादवाड, अरविंद लवटे, विनायक भाट, सिद्धेश पाटील, अशोक कुरुंदकर आदींचे सहकार्य लाभले.
 

संपादन - धनाजी सर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT